पालकांकडून संमतीपत्र लिहून घेणे अनिवार्य-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

शाळा (School) सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी शाळा व महाविद्यालयांना विविध सूचना केल्या आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घेणे शाळा व महाविद्यालयांना अनिवार्य केले आहे. जो विद्यार्थी शाळेत किंवा महाविद्यालयात येईल, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्या, अशा कडक सूचना मंत्री गायकवाड यांनी शाळा, महाविद्यालयांना दिलेल्या आहेत.

राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील प्राचार्यांशी (Video conferencing) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्सला औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची उपस्थिती होते.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी विविध सूचना केल्या आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात दीड वर्षांपासून बंद होते. त्यामुळे, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात येण्यासाठी पालकांनी चार-पाच दिवस आगोदर विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करावी. शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयात येण्यासाठी सकाळी विद्यार्थ्यांना वेळेवर उठवा. त्यांचे मन जाणून घ्यावे. तसेच, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी यथोचित स्वागत करावे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करावी. विद्यार्थ्यांना दररोज येण्यासाठी दबाव देखील टाकू नका, असे आदेश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थांची शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात गर्दी होऊ देऊ नका. जर शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात येणारा विद्यार्थी पॉझीटिव्ह आला तर घाबरून जाऊ नका. जो विद्यार्थी पॉझीटिव्ह आला त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करा. विद्यार्थ्यांची काळजी घ्या, असे आदेश देखील वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *