Friday, April 26, 2024
HomeUncategorizedडिसले गुरुजी अमेरिकेला जाणार; शिक्षणमंत्र्यांनी घेतली हमी

डिसले गुरुजी अमेरिकेला जाणार; शिक्षणमंत्र्यांनी घेतली हमी

मुंबई/सोलापूर | प्रतिनिधी Mumbai/Solapur

ग्लोबल टीचरचे पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना गेल्या महिन्यात अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली….(american government Fulbright scholarship to solapur Global teacher ranjitsing disale)

- Advertisement -

मात्र, त्यांना अद्याप अमेरिकेत जाण्यासाठी परवानगी मिळालेली नव्हती. डिसले गुरुजी यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार (ZP Education officers Dr Kiran Lohar)

यांनी सांगितले होते. यावरून वादंग उभे राहिले असतानाच आता या विषयात थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजी यांची हमी घेतली आहे. त्यामुळे डिसले गुरुजींचा अमेरिका दौरा आता पूर्ण होणार आहे.

अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात ४ डिसेंबर रोजी अमेरिकेच्यावतीने जगभरातील ४० शिक्षकांना प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर केली गेली आहे. “पीस इन एज्युकेशन” (Peace in Education) या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी डिसले यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली. याविषयावर संशोधन करण्यासाठी ६ महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावयाचा आहे.

या सहा महिन्यांचा सोलापूर जिल्हा परिषदेकडे (Solapur Zilla parishad) अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज त्यांनी केला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीला जेव्हा डिसले गुरुजी गेले तेव्हा त्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्याची माहिती देण्यात आली. तसेच शिक्षणाधिकारी लोहार यांनी डिसले गुरुजींवर अनेक गंभीर आरोप केले.

यामध्ये डिसले लोकांची दिशाभूल करतात. तसेच जिथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती होती, तिथे ते मागील ३ वर्षांपासून गैरहजर आहेत. त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड (Global teacher award) मिळाला, ही जरी आनंदाची बाब असली तरी त्याचा त्यांच्या शाळेला काही फायदा झाला नाही. असे प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांनी उपस्थित केले.

दरम्यान हा वाद चव्हाट्यावर आला. यानंतर डिसले गुरुजी यांच्याकडून राजीनाम्याची खबरदेखील समोर आली.

प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी या प्रकरणी लक्ष घालत डिसले गुरुजी या संशोधनासाठी नक्की अमेरिकेत जातील अशी हमी दिली आहे. त्यामुळे डिसले गुरुजी यांचा अमेरिकत जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या