खूशखबर ; खाद्यतेलाचे भाव आणखी कमी होणार!

शेंगदाणा-करडी 'जैसे थे'
खूशखबर ; खाद्यतेलाचे भाव आणखी कमी होणार!

औरंगाबाद - aurangabad

मलेशिया, इंडोनेशियातून (Malaysia, Indonesia) आवक कमी झाल्याने दोन महिन्यांपूर्वी खाद्यतेलाचे (Edible oil) भाव गगनाला भिडले होते. गेल्या दोन आठवड्यांत आवक वाढल्याने पामतेल (Palm oil) १५ रुपयांनी स्वस्त झाले. येत्या काही दिवसांत आणखी तीन ते चार रुपयांनी भाव कमी होतील, असे (Merchant) व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे.

(Petrol-diesel) पेट्रोल-डिझेलसोबत खाद्यतेलही महाग होऊ लागल्याने महिला वर्गात अस्वस्थता वाढली होती. म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयात शुल्क हटवले. शिवाय मलेशिया, इंडोनेशियातून पुरवठा सुरू झाला. त्याचा परिणाम बाजारात जाणवू लागला आहे. पामतेल १७० रुपयांवरून १५५ रुपये झाले आहे. करडी (२२० रुपये), शेंगदाणे (१८० रुपये) तेलाचे भाव जैसे थे आहेत. रिफाइंड सरकी - १६० ऐवजी १५८, सोयाबीन १७० ऐवजी १५८ रुपये लिटर झाले.

दरम्यान, औरंगाबादेत लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. २०२० पर्यंत पाच ते सात घाणे होते. ते आता पंधरापर्यंत पोहोचले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com