औरंगाबादेत 'ईडी'च्या धाडी!
USER

औरंगाबादेत 'ईडी'च्या धाडी!

सात पथके आल्याचे संकेत

औरंगाबाद - aurangabad

गेल्या काही दिवसांपासून राज्यात (ed) ईडीकडून विविध कारवाया केल्या जात आहेत. आता औरंगाबाद शहरातील उद्योजक देखील ईडीच्या निशाण्यावर आहेत. दुपारी बारा वाजल्यापासून दोन जणांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. अजूनही ईडीचे धाडसत्र सुरूच आहेत. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी निगडित संस्थानांवर या धाडी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये नक्षत्रवाडी परिसराचा समावेश आहे. दोन बड्या उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापासत्र सुरू आहे. यामध्ये आपदा संपत्ती आणि मनी लाँड्रींगच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर हे धाडसत्र सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com