नांदेडला भूकंपाचा धक्का; हानी नाही

यवतमाळ भूकंपाचा केंद्रबिंदू
नांदेडला भूकंपाचा धक्का; हानी नाही

औरंगाबाद - Aurangabad

नांदेड (Nanded) मध्ये भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून आज 11 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या गावात भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे बराच वेळ घरांचे पत्रे तर हललेच शिवाय घरातील सामान जमिनीवर पडले. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील वसमत शहरासह तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाण्याच्या सूचना तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या हादऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेडमधील गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरुंदा, इंजनगाव, म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोणवाडा, सुकळी, सेलू, अंबा, कौठा, खुदनापुर, किन्होळा सह वसमत या गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. अर्धापूर तालुक्यात आणि नांदेड शहरातील तरोडा नाका, सांगवी अशा अनेक भागात जमीन हलल्याचे जाणवले. मात्र, कुठलही नुकसान झालं नाही. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याची तीव्रता 4.4 रिस्टर स्केल असल्याची माहिती दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com