ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!

आता बसेसची प्रतीक्षा
ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!

औरंगाबाद - aurangabad

एसटी महांमडळाच्या (st bus) ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस (Electric buses) दाखल होणार आहे, अशी घोषणा होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापर्य ई-बसेस दाखल झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी (Charging station) मागील सात आठ महिन्यापासून काम सुरू केले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपले आहे. आठ दिवसात ई-बसेस चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होणार असल्याचे समजते.

ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे
ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!
धुळयात गुंगीकारक औषध साठ्यासह एकाला अटक

या ई-बसेस चार्जिंग स्टेशनमध्ये चार्जिंगसाठी कधी बसेस येणार हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत बसेस दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र लेखी स्वरूपात अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे तसे आदेश औरंगाबाद विभागाला मिळालेले नाहीत, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सागितले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे, अशी घोषणा तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी काही महिन्यापूर्वी केली होती. या अनुषंगाने औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत ई-चार्जिंग स्टेशनचे काम सात आठ महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. या चार्जिंग स्टेशनचे काम आता अंतिम टप्यात आले आहे.

ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!
धुळयात गुंगीकारक औषध साठ्यासह एकाला अटक
ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

मात्र, औरंगाबाद विभागाला किती इलेक्ट्रिक बसेस मिळणार हे अद्यापर्यंत स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील, असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. किती बसेस येतील हे अद्यापर्यत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कळालेले नाही. त्यामुळे डिसेंबरअखेर औरंगाबाद विभागाला किती बसेस मिळतील, हेही अद्याप स्पष्ट नाही. विभागाला मिळणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस या पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात येण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com