डी. एस. कुलकर्णी
डी. एस. कुलकर्णी|DSK
अन्य

DSK व कुटुंबियांना मुलीच्या तेराव्यास जाण्यास परवानगी

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस.के. त्यांच्या पत्नी आणि मुलासमवेत तुरूंगात आहेत. डीएसकेंची मुलगी अश्‍विनी देशपांडे यांचे कोरोनामुळं दुखःद निधन झालं.

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) Pune - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात बंदिस्त असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ DSK यांच्या मुलीचे कोरोनामुळे निधन झाल्याने मुलीच्या तेराव्याच्या विधीसाठी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी (१६ ऑगस्ट) त्यांना तुरुंगातून काही वेळासाठी सोडण्यात येणार आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस.के. त्यांच्या पत्नी आणि मुलासमवेत तुरूंगात आहेत. डीएसकेंची मुलगी अश्‍विनी देशपांडे यांचे कोरोनामुळं दुखःद निधन झालं. मात्र जेलमध्ये असल्यानं त्यांना पोटच्या मुलीच्या अंत्यविधीसाठीही उपस्थित राहता आलं नाही. म्हणून त्यांच्या तेराव्याच्या विधीसाठी डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी यांना जाण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार डीएसके यांना आपल्या कुटूंबासमवेत काही तास जाता येणार आहे. यावेळेस पोलिस बंदोबस्त आणि कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत.

दरम्यान गुंतवणूकदारांची दोन हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि इतर सहकारी तुरुंगात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com