थंडी वाढताच ड्रायफ्रुट्सला मोठी मागणी

महागाईतही वाढ
थंडी वाढताच ड्रायफ्रुट्सला मोठी मागणी

औरंगाबाद - aurangabad

गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट होत असून (Chikalthana) चिकलठाणा वेधशा‌ळेने सोमवारी किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. दरम्यान, थंडीची चाहूल लागताच आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुका मेवा अर्थात (Dried fruit) ड्रायफ्रुट्ला मागणी वाढली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत अंजीर, गोडंबी, काजू आदीचे भाव बऱ्यापैकी स्थिर आहेत. तर हिरवा पिस्तासह बदाम, जर्दाळू आदींच्या दरात सुमारे ५ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने थंडी सुरू होण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या काही दिवसांत तापमानात घट होत आहे. रविवारी चिकलठाणा वेधशाळेने किमान तापमान १२.० अंश सेल्सिअस नोंदविले होते. तर सोमवारी किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस एवढे होते. दरम्यान, थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी ड्रायफ्रुट्स परिणामकारक ठरतात. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी लाभधारक ठरणाऱ्या या पदार्थाना मागणी वाढली आहे. गुलंमडी, जुना मोंढ्यासह राजाबाजार येथील ड्रायफ्रुट्स शॉपीमध्ये ग्राहकांची रेलचेल वाढल्याचे चित्र आहे.

उब निर्माण करणाऱ्या मेथीचे तयार लाडू, सुका मेव्याचे लाडू, बदाम, काजू, अक्रोड, जर्दाळू, खोबरे, खारीक, डिंक, गोडंबी, पिस्ता, अंजीर, मेथी दाणा आदींना विशेष मागणी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हिरवा पिस्ता, बदाम, जर्दाळूसह अन्य काही मालाचे भाव काहीसे वधारले आहे. यासह मेथी दाणा १२० रुपये किलो, खसखस २४०० रुपये किलो, काळे मणुके ६०० ते ७०० रुपये, लाल मणुके ९०० ते १००० रुपये, चिल्ला गोझा ४४०० रुपये प्रती किलो असे दर असल्याचे सांगितले. थंडीची चाहूल लागल्यापासून पौष्टिक लाडूसह अन्य सुका मेव्याची मागणी वाढल्याचे नमूद केले.

ड्रायफ्रुट्सचे भाव असे (किलोप्रमाणे)

बदाम - ७२० ते ११००

बदाम मामरा - २४०० ते २६००

काजू - ९०० ते १६००

मनुके - ४०० ते ४४०

हिरवा पिस्ता - १८०० ते २०००

अक्रोड मगज - १४०० ते १७००

अंजीर - १००० ते १६००

जर्दाळू - ७०० ते १०००

खोबरे - २०० ते २२०

खारीक - ३०० ते ५५०

डिंक - ४०० ते ५००

गोडंबी - ९०० ते १०००

पेंडखजूर - १०० ते १४००

डिंक लाडू - ५६० - ५६०

मेथी लाडू - ५६० -५६०

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com