विमानतळ परिसरात ड्रोन ; दोघांवर कारवाई

विमानतळ परिसरात ड्रोन ; दोघांवर कारवाई

औरंगाबाद - aurangabad

विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रात (Airport Restricted Area) विनापरवानगी ड्रोन (Drones) उडवल्याने मागील तीन वर्षांत २ जणांवर विमानतळ प्राधिकरणाने (Airport Authority) कारवाई केली. २०२१ मध्ये केंद्र शासनाने (Central government) केलेल्या ड्रोन विषयक नियमावली नुसार ही कारवाई केली आहे. या आदेशानुसार (Central Industrial Security Force) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रोनला शूट करू शकतो. यासोबतच संबंधितांना जेलची हवा देखील खाण्याची वेळ येऊ शकते.

विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यास प्रथम त्याला उतरण्याचा इशारा द्यावा. ड्रोन आदेश पाळत नसेल तर त्याला शूट करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्राच्या तीन किलोमीटर क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडविल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट आदेशही दिला आहे. विमानतळ सुरक्षितता तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन उडवायचे असल्यास

विमानतळ प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. जून २०२१ मध्ये जम्मू येथील विमानतळावर स्फोटके असलेले दोन ड्रोन आढळले होती. या पार्श्वभूमीवर ही नियमावली केली आहे. ड्रोन किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या विमानांच्या साहाय्याने शहरावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यासाठी केंद्र शासनाने या संदर्भातील नियम कडक केले आहेत.

मुदत संपल्यावरही उडवले ड्रोन

एका संस्थेने कोविडपूर्व काळात विमानतळाच्या ३ किलोमीटर क्षेत्रात ड्रोन उडवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, परवानगीची मुदत संपल्यावर ड्रोन उडवल्याने कारवाईला सामोरे जावे लागले होते. विमानतळाशेजारी असलेल्या मंगल कार्यालयात आयोजित लग्नसमारंभात विनापरवाना ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येत होते. हे दोन्ही प्रकार सीआयएसएफ जवानाच्या निदर्शनास येताच कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com