ड्रायव्हिंग लायसन्सला पुन्हा मुदतवाढ नाही

ड्रायव्हिंग लायसन्सला पुन्हा मुदतवाढ नाही
Abdul Shaikh

औरंगाबाद - aurangabad

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने (Union Ministry of Transport) ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि वाहनांच्या परमिटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे जर का तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता १ फेब्रुवारी २०२० पूर्वी संपली असेल तर ती आतापर्यंत वैध मानली जात होती. परंतु सरकारच्या ताज्या आदेशानंतर ३१ ऑक्टोबर २०२१ नंतर ते बेकायदेशीर मानले जातील.

कोरोनामुळे आरटीओ (RTO) कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणात सरकारने मुदतवाढ दिली होती. मात्रं आता सरकारने पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबरनंतर या कागदपत्रांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्यामुळे जर आपले ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि वाहन परमिट यासारख्या कागदपत्रांची वैधता संपलेली असेल तर त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नूतनीकरण करून घ्यावे असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

याआधी ८ वेळा दिली मूदतवाढ

कोरोना काळात ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट सारख्या कागदपत्रांची वैधता आतापर्यंत ८ वेळेस वाढवण्यात आली आहे. करोना महामारी दरम्यान, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९, संबंधित कागदपत्रांची वैधता पहिल्यांदा ३० मार्च २०२० पर्यंत वाढवली होती. त्यानंतर, तारीख ९ जून २०२० पर्यंत वाढवली, नंतर पुन्हा २४ ऑगस्ट २०२०, २७ डिसेंबर २०२०, २६ मार्च २०२१, १७ जून २०२१, ३० सप्टेंबर २०२१ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मूदतवाढ दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com