मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही
अन्य

मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही

Rajendra Patil Pune

पुणे|प्रतिनिधी|Pune

मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही. करोनाच्या काळात सकारात्मकता आणि योग्य दक्षता ही महत्वाची असून मोठ्या प्रमाणात मानसिक तयारी महत्वाची आहे असा सल्ला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. डॉ. म्हैसेकर आज निवृत्त झाले. आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचे अनुभव कथन केले.

म्हैसेकर म्हणाले,“वेगवेगळ्या विभागाचं समन्वय ठेवणे हे मोठं आव्हान आहे. पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालय आणि नागरिकांमध्ये समन्वय साधणे मोठं आव्हान आहे. सध्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी सेंट्रल वाईज नियंत्रण सोमवारपासून सुरु करत आहोत”, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अजित पवारांनी केलेलं हे त्यांचे मोठेपण आहे, इतर अधिकारी सुद्धा आपापल्या परीने काम करत आहेत. सध्या आरोग्य यंत्रणेवर फार ताण आहे”, असं म्हैसेकरांनी सागंतिलं. काल मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर आमची अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक झाली. आमच्या चुका किंवा रिपोर्टिंगमध्ये काही समस्या असतील तर त्या दूर केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

चुकीचा आरोप झाला तर दुःख हे वाटतं : दीपक म्हैसेकर

ग्रामीण भागात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात बोलताना ते म्हणाले, लॉक भाजी, दूध खरेदी करताना मास्क वापरत नाही, त्यामुळे प्रसार होतो, अशा नागरिकांची आम्ही टेस्टिंग करतो. चांगलं काम करत असताना राजकीय आरोप झाल्यावर आम्हाला पण वाईट वाटतं. आम्ही सामान्य नागरिकांसाठी काम करतो, तर ते लोकप्रतिनिधी असतात. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. मात्र, चुकीचा आरोप झाला तर दुःख हे वाटतंच”, असंही दीपक म्हैसेकर म्हणाले.

दोन दिवस लॉकडाऊनवर अद्याप निर्णय नाही : दीपक म्हैसेकर

१४ दिवस हा जिल्ह्याचा सध्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर आहे. त्याचबरोबर विकएन्डला दोन दिवस लॉकडाऊन असा प्रस्ताव आहे, त्यावर मात्र अजून निर्णय घेण्यात आलेला नाही”, असंही विभागीय आयुक्तांनी सांगितलं.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com