पत्नीच्या मदतीने प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार ; 'सजग'कडून अटकेची मागणी

प्रा. बंडगर याला अटक करावी यासाठी 'सजग'च्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रा. बंडगर याला अटक करावी यासाठी 'सजग'च्या वतीने निवेदन देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


विद्यापीठ परिसरात विद्यार्थीनीच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे. परजिल्ह्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या ३० वर्षीय विद्यार्थिनीचे प्राध्यापकानेच पत्नीच्या मदतीने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रा. अशोक गुरप्पा बंडगर (वय ४८, रा. विद्युत कॉलनी, बेगमपुरा) यांच्या निलंबनाचे आदेश काढले. तसेच निलंबित प्राध्यापक बंडगर यांची स्वतंत्र खातेनिहाय आणि विशाखा समितीद्वारे चौकशी करण्याचे आदेशही पारीत केले.

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील ३० वर्षीय विद्यार्थीनी पूजा (नाव बदलले आहे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेत आहे. पूजाला प्रा. अशोक बंडगर यांनी आपल्या घरी पेईंग गेस्ट म्हणून ठेवले होते. ११ फेब्रुवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२३ या काळात प्रा. अशोक बंडगर याने पूजाचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार पूजाने प्रा. बंडगर यांची पत्नी पल्लवीला सांगितला. मात्र, प्रा. बंडगरने पूजाला तुझ्यामुळे माझे आयुष्य बर्बाद झाले आहे. आता आम्हाला दोन मुली असून तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा पाहिजे, तू माझ्या पतीसोबत लग्न कर, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकला. पती-पत्नीने संगनमत करून दोन वर्षे त्या मुलीचा छळ केला असून या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधी देखील अनेक प्राध्यापक, वेगवेगळ्या पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशीच कृत्ये करून शिक्षण क्षेत्राला बदनाम केले आहे.

प्रा. बंडगर याला अटक करावी यासाठी 'सजग'च्या वतीने निवेदन देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरात भरदुपारी पसरला 'अंधार'!

प्रा. बंडगरला अटक करा
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. अशोक बंडगर याच्याविरोधात एका विद्यार्थिनीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुशंगाने आज सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने बेगमपुरा येथील पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांना फरार आरोपी प्रा. बंडगर व त्याची पत्नी पल्लवी या दोघांना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्याचे निवेदन दिले. शिवाय प्रकरणातील पीडितेला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली.यावेळी विद्यापीठातील विशाखा समितीच्या अध्यक्ष प्रा. अंजली राजभोज यांना भेटून गुन्ह्याविषयीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी सजग महिला संघर्ष समितीच्या डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. आरतीश्यामल जोशी, ॲड. सुजाता पाठक, ॲड. जयश्री देशपांडे, सुनीता जाधव यांची उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com