Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’होणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’होणार

औरंगाबाद – Aurangabad

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च व तंञशिक्षण मंञी उदय सामंत यांनी 13 अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने देखील परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली आहे. मंञी सामंत यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात कडक निर्बंध लागू होण्यापूर्वींच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या तर परंपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेत होते. तर, पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षा 27 एप्रिलपासून सुरू होणार होत्या. माञ, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्या आहे.

आता तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 13 अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, बामू विद्यापीठ देखील सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणार आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांचे उरलेले पेपर 3 मे पासून ऑनलाइन घेण्यात येणार आहे. तर, पदव्युत्तरच्या परीक्षा 5 मेपासून ऑनलाईन घेण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या