'तो' रात्री-अपरात्री करत होता मुलीला अश्लील मॅसेज

'बामू'च्या पीआरओवर गुन्हा    
'तो' रात्री-अपरात्री करत होता मुलीला अश्लील मॅसेज

औरंगाबाद - Aurangabad

मराठवाड्यातील (Marathwada) शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी (Public relations officer) डॉ.संजय शिंदे यांनी रात्री - अपरात्री विचित्र मेसेज करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याने यांच्याविरुद्ध विद्यार्थीनीने विशाखा समितीकडे तक्रार केली आहे, यामुळे विद्यापीठात खळबळ उडाली असून या घटनेमुळे विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी एक विद्यार्थिनी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात गेली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळत विद्यार्थिनीने चेहऱ्यावर मास्क लावला होता. परंतु शिंदे यांनी तिचा चेहरा पाहता यावा यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले.

त्यानंतर माहितीसाठी म्हणून मुलीने आपला नंबर अधिकाऱ्याला दिला. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास जनसंपर्क अधिकारी शिंदे यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून विद्यार्थिनी विचित्र मेसेज पाठवले . त्यामध्ये 'डियर तू खूप सुंदर आहेस तू पहिल्या नजरेत आवडलीस मला तुझ्याशी मैत्री करायची आहे' अशा विचित्र भाषेत संवाद साधले. विद्यार्थिनीने त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर ' बोल ना तुला राग आला का ? ' असे प्रतिप्रश्न केले. तसेच त्यानंतर काही वेळातच त्यांनी मेसेज डिलीट केले.

यापूर्वी देखील त्यांनी अनेक मुलींसोबत असे प्रकार केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून अधिकारी आंबटशौकीन असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे, परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते आजही त्या पदावर कार्यरत आहेत. परंतु या विद्यार्थिनीने कोणत्याही दबावाला व भीतीला बाली न पडता विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी असे वागणे अशोभनीय असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनीने केली आहे.

याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com