
औरंगाबाद : Aurangabad
आई-वडील (Parents) आपल्या क्लॉथ स्टोअरच्या (Cloth Store) दररोजच्या व्यवहाराची माहिती घेतात. या रागातून २५ वर्षीय मुलाने जन्मदात्या बापासह सावत्र आईची (Stepmother) क्रूरतेने हत्या केली. हत्येनंतर मृतदेह गुंडाळून वेगवेगळ्या मजल्यावर लपविले. त्यानंतर निर्दयी मुलाने घराला कुलूप लावून पसार झाला. ही खळबळजनक घटना हत्येच्या तीन दिवसानंतर गजानन नगर (Gajanan Nagar) भागात उघडकीस आली. दरम्यान, मारेकरी मुलाला पोलिसांनी शिर्डी येथील एका लॉजमधून अटक केली.
शामसुंदर हिरालाल कलंत्री (वय ६१) व अश्विनी शामसुंदर कलंत्री (४५ वर्षे) (दोन्ही रा. गजानननगर औरंगाबाद) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर देवेंद्र शाम सुंदर कलंत्री (वय २५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. शामसुंदर हे पहिल्या पत्नी पासून विभक्त झाल्यानंतर त्यांचे दुसरे लग्न अश्विनी यांच्यासोबत झाले. आरोपी देवेंद्र हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तर दुसऱ्या पत्नी पासून त्यांना एक मुलगी आहे.
चौघेही सोबतच राहतात. मृत दाम्पत्याचे पुंडलिकनगरात बालाजी क्लॉथ स्टोअर (Balaji Cloth Store) नावाने दुकान आहे. ती दुकान सध्या त्यांचा मुलगा देवेंद्र चालवायचा. मात्र, तो रोजचा झालेल्या व्यवहाराची माहिती आई बडिलांना देत नव्हता. त्यावरून देवेंद्र आई वडील बोलायचे. शनिवारी (दि.२१) रोजी देखील दुकांनाच्या हिशेबावरून वाद झाला. त्याचाच राग मनात धरून देवेंद्रने आई- वडिलांची हत्या केली.
तीन दिवस मृतदेह सडले
दोन दिवस उलटून देखील कुणाच्याच मोबाईल (Mobile) वर संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या मुलीने पुंडलिकनगर गाठले तेथे आईच्या मैत्रिणीला भेटून हकीकत सांगितली व दोघेही घराकडे आले. घराजवळ येताच घरातून दुर्गंधी येत होती.घराला कुलूप असल्याने मुलीने शेजाऱ्याच्या गच्चीवरून पाहिले असता तेथे गच्चीवर रक्त दिसून आले.
भेदरलेल्या मुलीने ही माहिती आईच्या मैत्रिणीला दिली व त्यानंतर पोलिसांना पाचारण करून दरवाजा तोडण्यात आला. घरामध्ये जाताच मृतदेह (Corpses) पाहून सर्वच अवाक झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, साह्ययक आयुक्त विशाल ढुमे पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दिलीप गांगुर्डे, आदीची घटनस्थळी धाव घेतली. आयुक्तांनी तातडीने आरोपी मुलाच्या शोधासाठी विविध पथक तैनात केले. अखेर शिर्डी येथील एका लॉजमधून आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.