मूर्ती खरेदीसाठी गर्दी नको; अन्यथा विक्री बंद

मनपाचा कडक पवित्रा
मूर्ती खरेदीसाठी गर्दी नको; अन्यथा विक्री बंद

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती अगोदरच खरेदी करून ठेवावी. शेवटच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे, असे लक्षात आले तर उत्सवाच्या आधीचे दोन दिवस गणेश मूर्तींची विक्री बंद करू शकतो, असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला.

'गणेशोत्सवासाठी औरंगाबाद शहरात औरंगापुरा येथील जिल्हा परिषद मैदान आणि सिडको भागात दोन ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी दुकाने थाटली जातात. यंदा करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक 'झोन'मध्ये गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी विभागली जाईल,' असे महापालिका आयुक्तांनी नमूद केले.

गणेश मूर्ती विक्रीच्या प्रत्येक 'मार्केट'मध्ये 'अँटिजेन टेस्ट'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक विक्रेत्याला 'अँटिजेन टेस्ट' सक्तीची करण्यात आली आहे. प्रत्येक मार्केटमध्ये 'अँटिजेन टेस्ट'साठी शिबिर देखील भरविले जाणार आहे. नागरिकांना शिबारात जाऊन स्वत:ची चाचणी करून घेता येणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

औरंगाबाद- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती अगोदरच खरेदी करून ठेवावी. शेवटच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे, असे लक्षात आले तर उत्सवाच्या आधीचे दोन दिवस गणेश मूर्तींची विक्री बंद करू शकतो, असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला.

'गणेशोत्सवासाठी औरंगाबाद शहरात औरंगापुरा येथील जिल्हा परिषद मैदान आणि सिडको भागात दोन ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी दुकाने थाटली जातात. यंदा करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक 'झोन'मध्ये गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी विभागली जाईल,' असे महापालिका आयुक्तांनी नमूद केले.

गणेश मूर्ती विक्रीच्या प्रत्येक 'मार्केट'मध्ये 'अँटिजेन टेस्ट'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक विक्रेत्याला 'अँटिजेन टेस्ट' सक्तीची करण्यात आली आहे. प्रत्येक मार्केटमध्ये 'अँटिजेन टेस्ट'साठी शिबिर देखील भरविले जाणार आहे. नागरिकांना शिबारात जाऊन स्वत:ची चाचणी करून घेता येणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com