Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरोहित्र वाहतुकीसाठी आर्थिक व्यवहार करू नका-महावितरणचे आवाहन

रोहित्र वाहतुकीसाठी आर्थिक व्यवहार करू नका-महावितरणचे आवाहन

औरंगाबाद- रोहित्र वाहतुकीची जबाबदारी एजन्सी किंवा महावितरणकडे आहे. त्यामुळे नादुरुस्त किंवा दुरुस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराशी किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

Visual Story ये चांद सा रोशन चेहरा…

- Advertisement -

वीज पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी कृषिपंपास “एल अँण्ड टी’, “क्रॉम्प्टन’, ‘ग्रिव्हज्‌’, ‘सुबोधन’, “कॅपको “सारख्या आएसआय मानांकित कॅपासीटर बसविण्यात यावेत, अखंडित आणि सुरळीत विद्युत पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी कृषिपंपधारकांनी त्यांच्या वीजपंपावर ऑटो स्विच बसवू नयेत. कृषिपंपांना वीज पुरवठा करणारे वितरण रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्यासाठी कंत्राटदार एजन्सीची नियुक्‍ती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल, त्यासंबंधित माहिती शेतकऱ्यांनी नजीकच्या कार्यालयात किंवा १८००२१२३४३५/१८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर घावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑटो स्विचमुळे वीजपंप जळतात

अखंडित आणि सुरळित वीज पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी कृषीपंपधारकांनी त्यांच्या बीज पंपावर ऑटो स्विच बसवू नयेत. त्यामुळे कृषीपंप जळण्याची आणि रोहित्रही नादुरूस्त होण्याची शक्‍यता अधिक असते. रोहित्रावर असलेले अनधिकृत कृषीपंप व मंजुर भारापेक्षा जास्त भार असलेले कृषीपंप काढून टाकावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Visual Story ये चांद सा रोशन चेहरा…

- Advertisment -

ताज्या बातम्या