औरंगाबादला डॉक्टरांचे संमेलन

देश-विदेशातील डॉक्टर्स हाेणार सहभागी
औरंगाबादला डॉक्टरांचे संमेलन

औरंगाबाद - Aurangabad

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील (Pune B.J. Medical College) 1995 बॅचच्या विद्यार्थी डॉक्टरांचे वार्षिक स्नेह संमेलन दौलताबाद (Daulatabad) जवळील हिरण्य रिसॉर्ट (Hiranya Resort) येथे होणार आहे. दोन दिवसीय या सोहळ्यात देश-विदेशातील त्या बॅचचे डॉक्टर्स (Doctors) सहभागी होणार आहेत.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून हॉस्पिटल हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील नावाजलेले वैद्यकीय महाविद्यालये आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या शहरात या महाविद्यालयात विद्यार्थी राहिलेल्या डॉक्टर्सचे स्नेह संमेलन घेतले जाते. यंदा या सोहळ्याच्या आयोजनाचा मान औरंगाबादला मिळाला आहे. येत्या 25 व 26 सप्टेंबर रोजी दौलताबादजवळील निसर्गरम्य अशा हिरण्य रिसॉर्टमध्ये दोन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक डॉ. राजेंद्र बोलधने, डॉ. मनोज बर्डे, डॉ. आनंद पंचमहालकर, डॉ. मिलिंद फडके, डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. प्रसाद बोडस, डॉ. सचिन ढोले, डॉ. सुहास रहाणे, डॉ. महेश अहिरराव, डॉ. अभय खडके यांच्यासह अनेक डॉक्टर्स परिश्रम घेत आहेत.

कोविडमुळे एकमेकांना भेटणे अशक्य झाले असले तरी सप्टेंबर महिन्यात आयोजित 1995 बॅचच्या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून भेट शक्य होणार आहे. वेगवेगळ्या ज्वलंत सामाजिक विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा होणार आहे.

- डॉ. दीपक कर्पे, प्रवक्ते, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय (1995 बॅच)

1995 बॅचच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अर्थात आताच्या नामवंत अशा डॉक्टर्सचे ऐतिहासिक औरंगाबाद शहरात स्वागत करण्यासाठी आम्ही स्वागतोच्छुक आहोत. नक्कीच या भेटीने सगळ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल

- डॉ. राजेंद्र बोलधने, निमंत्रक, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय (1995 बॅच)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com