
औरंगाबाद - aurangabad
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त (National Consumer Day) जिल्हा प्रशासनाच्यावतीने (District Administration) आणि सामाजिक विकास संस्थेच्या सहकार्याने 40 तृतीयपंथी कुटुंबांना केशरी शिधापत्रिकेचे (ration card) वितरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि जिल्हापुरवठा अधिकारी (District Supply Officer) वर्षाराणी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत राबविण्यात येणा-या धान्य वितरण योजना बाबत जनजागृती करण्यासाठी बनविण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते करण्यात आले.
या चित्ररथाव्दारे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी,तक्रार निवारण प्रणाली तसेच पुरवठा विभागाशी सबंधीत योजना बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हा चित्ररथ औरंगाबाद शहर तसेच सर्व तालुका मुख्यालयाचे ठिकाणी जनजागृती करणार आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमीत्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत या वर्षीची “Effective disposal of cases in Consumer Commissions ” हि संकल्पना आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमीत्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत या वर्षीची “Effective disposal of cases in Consumer Commissions ” या संकल्पनेची माहिती दिली. तसेच ग्राहकांना तक्रार असल्यास त्या करीता दाद मागण्यासाठी उपलब्ध यंत्रणे बद्दल माहिती दिली तसेच ग्राहक आयोगाने या वर्षी ऑनलाईन पोर्टल सुरू केले असून ज्याव्दारे 18 भाषेत ग्राहक तक्रार नोंदवू शकतील यामुळे ग्राहकांचा तक्रार दाखल करण्याकरिताचा वेळ व परिश्रम वाचतील असेही त्यांनी सांगितले.