गरीब कल्याण अन्न योजनतर्गंत मोफत अन्नधान्य वाटप

पोर्टेबिलीटी सुविधेचाही वापर
गरीब कल्याण अन्न योजनतर्गंत मोफत अन्नधान्य वाटप

औरंगाबाद - Aurangabad

जिल्हयातील गरिबांना मे महिन्याचे नियमीत व मे व जून महिन्याकरिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्यामुळे औरंगाबाद जिल्हयातील सर्व 1802 रास्त भाव दुकानदार यांनी त्यांचे रास्त भाव दुकान पुर्णवेळ चालू ठेवून पात्र लाभार्थी यांना लवकरात लवकर धान्य वितरीत करुन कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सूचित करुन सर्व लाभार्थी यांनी मोफत प्राप्त धान्याचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्हयामध्ये 1802 रास्त भाव दुकाना मार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमान्वये 3,21,821 एवढया अंत्योदय अन्नयोजनेच्या (AAY) लाभार्थ्यांना व 20,08,530 एवढया प्राधान्य कुटुंब योजनेच्या (PHH) लाभार्थ्यांना नियमितपणे अन्नधान्याचे वितरण केले जाते.

तथापि, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात अनेक निर्बध लावण्यात आलेले आहे. त्यामुळे गरीबांना कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी यांना माहे मे करिता नियमीत धान्य मोफत देण्यात येणार आहे. तसेच भारताचे पंतप्रधान यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न (PMGKAY-3) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिमाह मे व जून महिन्याकरिता प्रतिसदस्य 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचे आदेशित केले आहे.

या आदेशाप्रमाणे औरंगाबाद जिल्हयातील अंत्योदय अन्न योजनेतील 3,21,821 व प्राधान्य कुटुंब योजनतील 20,08,530 असे एकुण 23,30,351 लाभार्थ्यांना प्रतिलाभार्थी 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त माहे मे व माहे जुन 2021 या दोन महिन्याकरिता मोफत वितरीत करण्यासाठी प्रतिमाह गहू 6952 मे. टन व तांदुळ 4701 मे. टन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील तसेच इतर राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थी यांना सुध्दा या योजनेचा लाभ पोर्टबिलीटी (Portablitity) सुविधेचा वापर करुन दिला जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com