Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedदेवगिरी बँकेकडून पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांचे वाटप

देवगिरी बँकेकडून पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांचे वाटप

औरंगाबाद – Aurangabad

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबादतर्फे ‘पाणपोई- मुक्या पाखरांसाठी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. याच्या माध्यमातूनदोरी बांधलेले मातीचे भांडे सभासदांना घरपोच नेऊन दिले जात आहे. 

- Advertisement -

यंदाच्या कडक उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे व त्यांच्यासाठी हा उन्हाळा सुसह्य व्हावा या भावनेतून व बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. बँकेच्या सभासदांच्या घरी असलेल्या लहान मुलांच्या हातून हे भांडे बाहेर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ज्यायोगे लहान मुलांवर भूतदयेचे संस्कारही होतील. तसेच सध्याच्या कठीण परिस्थितीत कुंभारांचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला, त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे माती खोदून आणणाऱ्यापासून ते भांडे तयार करणारा, वाहतूक करणारा, कोळसा देणारा आणि विकणारा असे अनेक कुटुंबे ज्यावर अवलंबून आहेत त्या सर्वांना देवगिरी बँकेच्या या प्रकल्पामुळे हातभार लागला लागला आहे. त्यांना रोजगार मिळाला आहे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतूनही ह्या उपक्रमाची सुरुवात देवगिरी बँके कडून करण्यात आली आहे.

या उपक्रमाअंतर्गत दोरी बांधलेले मातीचे भांडे सभासदांना घरपोच नेऊन दिले जात आहे. बँकेचे कर्मचारी कार्यालयात येण्यापूर्वी अथवा घरी जाताना सभासदांना हे भांडे घरपोच नेऊन देत आहे. प्रत्येक कर्मचारी निरपेक्ष भावनेने काम करत आहे. सदर उपक्रमाचे सर्व सभासदांकडून कौतुक होत आहे व असे नित्य नवे उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल सर्व स्तरातून बँकेचे अभिनंदन होत आहे.

अनेकांची ईच्छा असते संध्याकाळी घरी येताना मातीचे भांडे घेऊन येऊ, पण कधीच शक्य होत नाही, आणले तरी त्याला दोरीचं शिंक बांधन शक्य होत नाही, त्यामुळे देवगिरी बँकेने असं मातीचं भांड आणि त्याला दोरीचं शिंक बांधून सभासदांना घरपोच देत आहोत, मुलांच्या हाताने ते एका कोपऱ्यात बांधत आहोत, यामुळे सर्वांच्या मनातील स्वप्न देवगिरी बँकेचे कर्मचारी पूर्ण करीत आहेत आणि यामुळे सर्वजण मनापासून आशीर्वाद आम्हाला देत आहेत, लॉकडाउनच्या संकटामुळे उपासमारीला तोंड देत असल्यामुळे, त्यांचीही सेवा आम्ही करू शकलो याचे समाधान आहे, सर्व कर्मचारी निरपेक्ष भावनेने हे करताहेत, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

– किशोर शितोळे, अध्यक्ष, देवगिरी बँक

- Advertisment -

ताज्या बातम्या