नवीन कपडे, स्वादिष्ट मिठाईने सुखावले चिमुकले!

सेवा फाऊंडेशनचा उपक्रम
नवीन कपडे, स्वादिष्ट मिठाईने सुखावले चिमुकले!

औरंगाबाद - aurangabad

पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असणाऱ्या कुटुंबाना मनोमन इच्छा असूनही सण-उत्सवाचा मनस्वी आनंद घेता येत नाही. हातात असणारी रक्कम आणि कुटूंबाच्या गरजांचा ताळमेळ लागत नाही. ही बाब लक्षात घेऊन शहरातील सेवा फाऊंडेशनने यंदाच्या (Diwali) दिवाळीत वंचित कुटुंबातील बालकांना फराळ आणि नवे कपड्यांची भेट दिली. अचानक मिळालेल्या या भेटीने चिमुकले सुखावले, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

स्वंयसेवी संस्था सेवा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी गरीब, वंचित कुटूंबासोबत दिवाळी साजरी केली जाते. यानिमित्ताने समाजाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांना मदत केली जाते. यंदा बीड-बायपास रोडवरील एका मैदानात झोपड्या करून राहणाऱ्या कुटुंबांसोबत सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. हे कुटूंबीय मजुरी करून जगतात. त्यांची दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. येथील ७५ हून अधिक मुलांना नवेकोरे कपडे आणि त्यांच्या कुटूंबियांना फराळ भेट दिला. या भेटीने चिमुुकल्यांसह त्यांचे कुटूंबीय सुखावले. एकमेकांना नवीन कपडे दाखवत मुलांनी आनंद व्यक्त केला. चविष्ट फराळाच्या मेजवाणीने कार्यक्रमात रंगत आणली. मुलांनी मनसोक्त फराळाचा आस्वाद घेतला.

उपक्रमासाठी सुमित खांबेकर, सलीम शेख, प्रतीक गायकवाड, जय वावरे, शुभम लोहाडे, विजय वावरे, गजानन गोमटे, सुषमा गायकवाड, अफसर शेख, नेहा गुंडेवार, स्वाती वेदपाठक, मयूरी व्यवहारे, ईश्वर पाटील, राजू पाटील, संतोष शिंगारे, विनायक भारेकर, रोहन देशमुख, अभिजित कुलकर्णी, शैलेश देवगावकर, मनोज वडगावकर, पंकज मंडके, राजू मोरे, कविता जीवने, मोनाली खंडेलवाल आदी परिश्रम घेतले.

सण साजरा झाला

आमच्यासाठी मुलांचा आनंद महत्त्वाचा आहे. आम्ही दिवसभर राबूनही त्यांच्या इच्छा पुर्ण करु शकत नाही. सेवा फाऊंडेशने आणलेले कपडे आणि खाऊमुळे खऱ्या अर्थाने आमचा दिवाळसण साजरा झाला.

-रमा पवार, रहिवासी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com