कारवाईच्या भीतीने रस्त्यावरून रिक्षा गायब!

औरंगाबाद आरटीओ मैदानात
कारवाईच्या भीतीने रस्त्यावरून रिक्षा गायब!

औरंगाबाद - aurangabad

नियमांची पायमल्ली करत भरधावपणे धावणाऱ्या रिक्षांना (auto rickshaw) औरंगाबाद आरटीओ विभागाने चांगलेच वठणीवर आणले आहे. गेल्या पाच दिवसात शंभरावर रिक्षा जप्त करण्यात आल्याने रिक्षा चालकांनी मोठा धसका घेतला आहे. अर्ध्यापेक्षा अधिक रिक्षा कारवाईच्या भीतीने रस्त्यावरून गायब झाल्या आहेत.  

प्रादेशिक परिवहन कार्यालयासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी  रिक्षा चालकांविरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा उभ्या ठेवून चक्का जाम केल्याचे दिसून येत आहे. कारवाईच्या भीतीपोटी जवळपास ३५ टक्के रिक्षा या घरासमोरच उभ्या केल्या आहेत. ज्या रिक्षा चालकांनी आरटीओच्या नियमांची कोटेकोरपणे पूर्तता केली आहे, अशाच रिक्षा आता रस्त्यावर धावताना दिसून येत आहे.


रिक्षा चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरित्या धडक कारवाईला सुरुवात केली आहे. मीटर अद्यायावत करण्यासाठी अनेक रिक्षाचालकांनी मीटर गॅरेजकडे रांगा लागल्या आहेत. तर अनेक रिक्षा चालकांनी आपले मीटर अद्यायावत करू घेतले आहे. तसेच आरटीओच्या सर्व नियमाची पूर्तता केली आहेत, अशा स्वरूपाच्या रिक्षा मात्र प्रवासी वाहतूक करताना शहरात दिसून येत आहे. सदरची कारवाई ही ३० नोव्हेंबरपर्यंत सुरूच राहणार असल्याने कागदपत्रे नसलेल्यांनी आपल्या रिक्षा घरासमोर उभ्या केल्याचे चित्र आहे.

एका रिक्षाचालकांने मुलीसोबत असभ्य वर्तन केल्यानंतर त्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंत आरटीओ कार्यालय आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कायदे व नियम पायदळी तुडविणाऱ्या रिक्षा चालकांना चांगलाच धडा शिकवत शंभरावर रिक्षा जप्त केल्या. आरटीओ आणि शहर वाहतूक पोलिसांनी शहराच्या कान्याकोपऱ्यात जाऊन रिक्षा चालकावर कारवाई सुरू केली आहे. यामुळे रिक्षा चालकांची चांगलीच नाकेबंदी झाली आहे.

आता नव्याने आलेले काही रिक्षा चालक आपल्या रिक्षातील टेप रेकॉर्डचा आवाज वाढवणे, प्रवाशांना साइड ग्लासमध्ये वारंवार बघणे अशा स्वरूपाचे कृत्य करतात. याला आळा घालण्यासाठी रिक्षा चालकांवर कारवाई होणे अपेक्षितच असल्याचा सूर उमटत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com