संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची नासधूस

औरंगाबादेतील घटना
संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची नासधूस

औरंगाबाद - aurangabad

एका तरुणीवर शस्त्रक्रिया केल्यावर ती शुद्धीवर न आल्याने नातेवाईकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी हॉस्पिटल फोडून टाकले. या खळबळजनक घटनेने औरंगाबाद शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

जकात नाका परिसरातील हॉस्पिटलची रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शहरातील एमजीएम रुग्णालयाच्या समोर असलेल्या इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. तोपर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
महात्मा गांधी मिशनच्या रुग्णालयाच्या समोर असलेल्या इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये एका वीस वर्षे तरुणीला दाखल करण्यात आले होते. या तरुणीच्या पोटात दुखत असल्याने तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया केल्यानंतरही सदरील तरुणी शुद्धीवर आली नसल्याने हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला सिटी स्कॅन करण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवले. यासाठी रुग्णासोबत इंटरनॅशनल हॉस्पिटलचे दोन डॉक्टर देखील होते. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यानंतर सदरील दोन्ही डॉक्टरांनी पळ काढला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
तरुणीला दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर रुग्णासोबत आलेले दोन्ही डॉक्टरांनी पळ काढला. मात्र त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुन्हा इंटरनॅशनल रुग्णालय गाठून शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांशी बोलण्याची मागणी केली. मात्र, एकही डॉक्टर समोर न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com