लसी मुबलक असूनही नागरिक फिरकेना

लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष
लसी मुबलक असूनही नागरिक फिरकेना

औरंगाबाद - Aurangabad

मागील महिनाभरापासून (corona) कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यामुळे केंद्रांवरील लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी देखील ओसरली आहे. मागील तीन दिवसापासून चार ते साडेचार हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. लसीचा साठा उपलब्ध असतानाही नागरिकांनीच आता लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद पालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन सरकारने पालिकेला 11 लाख 77 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आजवर 7 लाख 29 हजार 931 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

लसीकरणाला गती मिळाली असतानाच कोरोनाची दुसरी लाट ओसरली. यामुळे नागरिकांकडून लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्र व राज्य सरकारने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे. त्यादृष्टीने तयारी करून ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. लसीकरण वाढविण्यासाठी लस उपलब्ध करून दिली जात असली तरी केंद्रांवर मात्र लसीकरणासाठी गर्दी दिसत नाही.

पंधरा दिवसापूर्वीच लसीकरण केंद्रांवर दहा ते पंधरा हजार दरम्यान नागरिकांचे लसीकरण होत होते. ते आता चार ते साडेचार हजारांवर आले आहे. लसीकरणासाठी लांबच लांब रागा लागल्याचे चित्र मागील आठ दिवसापासून शहरातील कोणत्याही केंद्रावर पहायला मिळालेले नाही. 2 सप्टेंबर रोजी 4 हजार 832, 3 रोजी 3 हजार 801, 4 रोजी 4 हजार 384 नागरिकांचेच लसीकरण झाल्याची नोंद आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com