लोकसंघर्ष मोर्चाचे आपापल्या गावात निदर्शने

निमित्त किसानमुक्ती दिनाचे
लोकसंघर्ष मोर्चाचे आपापल्या गावात निदर्शने

जळगाव - Jalgaon

आज दि.९ ऑगस्ट हा ऑगस्टक्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी इंग्रज राजवटी विरोधात “चले जाव” चा नारा दिला गेला होता याच दिवसाच औचित्य साधत देशभरातील शेतकरी संघटना या दिवशी किसान मुक्तीचा नारा घेवून आंदोलनासाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा काळ लक्षात घेता आपापल्या गावातच निदर्शने करण्यात येत आहेत.

तसेच पंतप्रधान यांना आपल्या ९ मागण्यांचे पत्र पाठवले जाईल व स्थानिक ठिकाणी तहसीदार यांना दि.१० ऑगस्ट रोजी निवेदन देणार आहेत. जागतिकीकरणाचा स्वीकार करून खाजगीकरनाचे उदारमतवादी धोरण आम्ही स्वीकारले तेव्हाच या सर्व धोरणात यादेशातील सर्वसामान्य जनता येथील शेतकरी जल, जंगल जमिनीवर अवलंबून असणारा आदिवासी येथील मजुरी करणारा कष्टकरी मजदूर नाडला जाणार, संपवला जाणार, त्याचे शोषण केले जाणार हे जाहीर होते परंतु आता देशभरातील शेतकरी आदिवासी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेने या विरुद्ध एल्गार पुकारला असून त्याचाच एक भाग म्हणजे आज दि.९ ऑगस्ट रोजी होणारे देशव्यापी किसान आंदोलन.

उत्तर महारष्ट्रातील आदिवासी शेतकरीही यात सहभागी झाले असून जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील शेकडो गावांमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्या मधील शेकडो गावांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सहभाग घेतला जात आहे.

या गावांमधील शेतकरी आपापल्या गावांमध्ये कोरोनाचे नियम व शारीरिक अंतर पाळत निदर्शने करतील तसेच आपापल्या तालुकास्तरावर तहसील दार यांना दि.१० ऑगस्ट रोजी निवेदने देणार आहेत. तरी शासनाने या किसान मुक्ती आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा हे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही

प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अशोक पवार, भरत बारेला, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, धर्मा बारेला, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, भारती गाला, संदीप घोरपडे, पन्नालाल मावळे, अतुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, सोमनाथ माळी, इरफान तडवी, अहमद तडवी (लोकसंघर्ष मोर्चा) यांनी प्रशासनास दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com