Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedदिलासादायक ; औरंगाबादेत कोरोनाबाधित बालकांच्या संख्येत घट

दिलासादायक ; औरंगाबादेत कोरोनाबाधित बालकांच्या संख्येत घट

औरंगाबाद – Aurangabad

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना औरंगाबादकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब घडली आहे. शहरातील कोरोनाबाधित बालकांची संख्याही घटू लागल्याचे पालिकेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे. गेल्या दीड महिन्यात शून्य ते अठरा या वयोगटातील कोरोनाबाधित बालकांची संख्या २,८७९ होती, पण गेल्या सात दिवसांत याच वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ असल्याचे लक्षात आले आहे.

- Advertisement -

शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. मार्च, एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेने प्रशासकीय यंत्रणांसह सर्वसामान्य नागरिकांसमोरही चिंता निर्माण केली होती. या काळात शहरात एकाच दिवसात कोरोनाबाधित आढळलेल्यांची संख्या १९०० पेक्षा जास्त झाली होती. ही विक्रमी संख्या होती, परंतु त्यानंतर प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची व या लाटेत शून्य ते अठरा या वयोगटातील बालकांना मोठ्या प्रमाणावर लागण होईल असे मानले जात आहे. तज्ज्ञांनी तसा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शासकीय, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संदर्भात पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दीड महिन्यात शून्य ते पाच या वयोगटातील ४६५ बालकांना कोरोनाची लागण झाली, तर पाच ते अठरा या वयोगटातील २४१५ बालके कोरोनाबाधित झाली. या दोन्हीही गटातील बालकांची बेरीज केली असता दीड महिन्यात २८७९ बालकांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात येत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना १ ते ७ जून या सात दिवसात शहरातील केवळ ३८ बालकांना करोनाची लागण झाल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह शहरवासीयांनाही दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या