'एमसीव्हीसी' संस्था होणार 'आयटीआय'

एमसीव्हीसीच्या अभ्याक्रमांचे महत्व वाढणार, कौशल्य विकास विभागाचा निर्णय
'एमसीव्हीसी' संस्था होणार 'आयटीआय'

औरंगाबाद - Aurangabad

राज्यात अकरावी आणि बारावी स्तरावर राबविण्यात येत असलेल्या किमान कौशल्यावर आधारित (Skill Development Department) अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) (MCVC) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय ITI) रूपांतर करण्याचा निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय तीन एमसीव्हीसी संस्थांचे रूपांतर आयटीआयमध्ये होणार आहे.

कौशल्य विकास विभागाने 4 फेब्रुवारीला एमसीव्हीसीचे (ITI) आयटीआयमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध दर्शविला होता. माञ, कौशल्य विकास विभागाने (Skill Development Department) आपला निर्णय कायम ठेवल्यामुळे आता औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यातील तीन एमसीव्हीसी संस्थांचे रूपांतर आयटीआयमध्ये होणार आहे. त्यामुळे, यंदा विद्यार्थ्यांना एमसीव्हीसीला प्रवेश घेता येणार नाही.

मात्र, ज्या विद्यार्थ्यांना एमसीव्हीसीतील अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना आयटीआयमध्ये जाऊन सदरील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. पूर्वी, एमसीव्हीसीमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे जरा अवघडच होते. मात्र, आता कौशल्य विकास विभागाने एमसीव्हीसीचे रूपांतर आयटीआयमध्ये केल्यामुळे एमसीव्हीसीच्या अभ्याक्रमांचे महत्व वाढणार आहे. त्यामुळे, एमसीव्हीसीच्या सदरील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना हमखास नोकरीची संधी मिळेल, असाही दावा सूत्रांनी केला.

Related Stories

No stories found.