Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedपंडित नाथराव नेरळकर यांचे निधन

पंडित नाथराव नेरळकर यांचे निधन

औरंगाबाद – Aurangabad

मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज (२८ मार्च, रविवार) औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती. नाथरावांचं जन्मगाव नांदेड आहे. त्यांच्या पश्चात अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर उपासनी ही मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले. २०१५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता. यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या