5-जी लॉन्चनंतर डेटा वापर दुपटीने वाढण्याची अपेक्षा

रिलायन्स जीओच्या प्रवक्त्याला विश्वास
5-जी लॉन्चनंतर डेटा वापर दुपटीने वाढण्याची अपेक्षा

मुंबई । Mumbai । प्रतिनिधी

रिलायन्स जीओचा (Reliance jio) फोर-जी ब्रॉडबँड बाजारात आल्यानंतर ग्राहकांची संख्या चार पटीनी वाढली आणि इंटरनेट स्पीड पाच पटीनी वाढला. आता रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Reliance chief Mukesh Ambani) यांनी जाहीर केल्यानुसार येत्या दिवाळीला 5-जी लॉच झाल्यानंतर तर या वापरात आणखी प्रचंड प्रमाणात वाढत होणार असल्याचा विश्वास रिलायन्स जीओच्या प्रवक्त्याने व्यक्त केला. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स जिओ 5 सप्टेंबर 2022 रोजी लॉन्च झाल्याचा 6 वा वर्धापन दिन साजरा होत असताना ते बोलत होते.

कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की, गेल्या 6 वर्षांत, दूरसंचार उद्योगाने दर महिन्याला सरासरी दरडोई डेटा वापरामध्ये 100 पट वाढ नोंदवली आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, जिओ लॉन्च होण्यापूर्वी प्रत्येक भारतीय ग्राहक एका महिन्यात केवळ 154 एमबी डेटा वापरत होता. आता डेटा वापराचा आकडा 100 पटीने वाढून प्रति ग्राहक प्रति महिना 15.8 जीबी इतका आश्चर्यकारक स्तरावर पोहोचला आहे. दुसरीकडे जिओ वापरकर्ते दरमहा सुमारे 20 जीबी डेटा वापरतात, जो इंडस्ट्रीच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी जास्त आहे असेही हा प्रवक्ता म्हणाला.

4-जी तंत्रज्ञानाबाबत रिलायन्स जिओचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. आता 5-जी बाबत कंपनीचे मोठे प्लॅन्सही समोर येत आहेत. कंपनी कनेक्टेड ड्रोन, कनेक्टेड अ‍ॅम्ब्युलन्स-हॉस्पिटल्स, कनेक्टेड फार्म्स-बार्न, कनेक्टेड स्कूल-कॉलेज, ईकॉमर्स इझी, अतुलनीय वेगाने मनोरंजन, रोबोटिक्स, क्लाउड पीसी, इमर्सिव टेक्नॉलॉजीसह व्हर्च्युअल थिंग्ज यांसारख्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवत आहे असे ते म्हणाले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 6 वर्षांपूर्वी जेव्हा जिओ लाँच केले, तेव्हा कोणीही अंदाज लावू शकत नव्हते की लॉन्च झाल्यानंतर काही वर्षांत जिओ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक बनेल. पण आज जिओ ने 41.30 दशलक्ष मोबाईल आणि सुमारे 7 दशलक्ष जिओ फायबर ग्राहकांसह भारतातील 36% मार्केट शेअर व्यापला आहे. महसुलाच्या बाबतीत त्याचा वाटा 40.3% आहे. जिओच्या स्वदेशी 5-जी तंत्रज्ञानामुळे, आगामी काळात काय बदल घडतील किंवा होऊ शकतील याचे चित्र कंपनीच्या गेल्या 6 वर्षांतील कामगिरीवरून दिसून येते, याकडेही त्यानी लक्ष वेधले.

यावेळी त्यांनी रिलायन्स जिओच्या सहा वर्षांच्या वाटचालीत कोणाला किती फायदा झाला, याचा आलेखही सादर केला. ते म्हणाले, जिओने या देशात आउटगोइंग व्हॉईस कॉल विनामूल्य केले आहेत तेही सर्व नेटवर्कवर, ग्राहकांसाठी हा पहिला अनुभव होता. मोबाईल वापरणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. मोबाईल बिलातही मोठी घट झाली आहे. जिओच्या मोफत आउटगोइंग कॉल्समुळे इतर ऑपरेटर्सवर खूप दबाव आला आणि त्यांना त्यांची रणनीती बदलून किंमत कमी करावी लागली.

जगातील सर्वात स्वस्त डेटा

केवळ डेटाचा वापर भारतात सर्वाधिक आहे, गेल्या 6 वर्षांत डेटाच्या किमतीही जमिनीवर आल्या आहेत. जिओच्या लॉन्चच्या वेळी, देशातील ग्राहकांना 1 जीबी डेटासाठी सुमारे 250 रुपये मोजावे लागत होते. डेटाच्या किमतींबाबत जिओच्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आज 2022 मध्ये डेटा सुमारे 13 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच 6 वर्षांत डेटाच्या किमती जवळपास 95 टक्क्यांनी घसरल्या आहेत. हा आकडा देखील खूप खास आहे कारण जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये डेटाच्या किमती भारतात सर्वात कमी आहेत याकडे त्यानी लक्ष वेधले.

रिलायन्स जिओ हा भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे. सरकारी प्रयत्नांमुळे आणि जिओच्या स्वस्त डेटामुळे मिळालेल्या जागरूकतामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला जीवदान मिळाले आहे. जिओच्या लॉन्चच्या वेळी म्हणजेच सप्टेंबर 21016 मध्ये णझख द्वारे केवळ 32.64 कोटी व्यवहार झाले होते. ऑगस्ट 2022 पर्यंत यामध्ये मोठी वाढ झाली होती, आज णझख व्यवहार 10.72 लाख कोटींचे आहेत. कारण स्पष्ट आहे, गेल्या 6 वर्षात केवळ ब्रॉडबँड ग्राहक 19.23 दशलक्ष (सप्टे. 2016) वरून 800 दशलक्ष (जून 2022) पर्यंत नुसते वाढले नाहीत तर सरासरी इंटरनेट स्पीड देखील 5.6 एमबीपीएस (मार्च 2016) वरून 5 पटीने वाढून 23.16 एमबीपीएस (एप्रिल 2022) पर्यंत पोहोचला आहे अशी माहिती त्यानी दिली.

युनिकॉर्न कंपन्यांबाबत ते म्हणाले, आज भारत 105 युनिकॉर्न कंपन्यांचे घर आहे. ज्यांचे मूल्य 338 अब्ज पेक्षा जास्त आहे. तर जिओ लॉन्च होण्यापूर्वी भारतात फक्त 4 युनिकॉर्न कंपन्या होत्या. युनिकॉर्नला खरेतर स्टार्टअप कंपन्या म्हणतात ज्यांची एकूण संपत्ती 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे आहे. 2021 मध्ये युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत 44 स्टार्टअप्सनी आपले स्थान निर्माण केले आहे. नव्याने तयार केलेले युनिकॉर्न आपल्या यशाचे श्रेय जिओला देते. शेअर बाजारात युनिकॉर्न कंपनी झोमॅटोच्या बंपर लिस्टनंतर झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी अधिकृतपणे जिओचे आभार मानले.

जिओफोनच्या किमयेकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, जिओने करोडो लोकांना डिजिटल जगाशी जोडले. देशातील सुमारे 500 दशलक्ष लोक जुन्या आणि महागड्या (कॉलिंगसाठी) 2-जी तंत्रज्ञान वापरत होते कारण त्यांच्याकडे 4-जी तंत्रज्ञानावर चालणारे महागडे फोन विकत घेण्यासाठी पैसे नव्हते किंवा त्यांना बटणे असलेला फोन वापरायचा होता. जिओने परवडणार्‍या दरात 4-जी जिओफोन लॉन्च करून या दोन्ही समस्या दूर केल्या. जिओफोन हा भारतीय बाजारपेठेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी मोबाईल फोन ठरला आहे. त्याची 11 कोटींहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. जिओ ने जिओफोनच्या माध्यमातून लाखो उपेक्षित लोकांना डिजिटल जगाशी जोडले आहे.

कोरोना काळात वर्क फ्रॉम होम संकल्पना राबविण्यात जिओफायबरने बजावलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करताना, ’लॉकडाऊनच्या तडाख्याला तोंड देत देशात जिओची फायबर सेवा मोठा आधार म्हणून उदयास आली होती. लॉकडाऊनमध्ये इंटरनेट नसेल तर कल्पना करा आपली काय अवस्था झाली असती. वर्क फ्रॉम होम (Work from home) असेल, क्लास फ्रॉम वर्क असेल किंवा ई-शॉपिंग जिओफायबर त्याच्या विश्वासार्ह सेवेने आणि गतीने कोणतेही काम थांबू देत नाही.

अवघ्या तीन वर्षांत 70 लाख कॅम्पस जिओफायबरशी जोडले गेले आहेत. घरून काम करण्याची संस्कृती कंपन्यांना इतकी आवडली की लॉकडाऊननंतरही अनेक कंपन्या घरूनच काम करण्यावर भर देत आहेत. जीवन सुकर करण्यासोबतच, जिओफायबर अप्रत्यक्षपणे रोजगारही निर्माण करत आहे. गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या अनेक इंटरनेट, ई-कॉमर्स, होम डिलिव्हरी आणि मनोरंजन कंपन्यांनी हजारो लोकांना नोकर्‍या दिल्या आहेत. वाढेल. तज्ञांचा असा विश्वास आहे की 5-जी तंत्रज्ञानाच्या उच्च कार्यक्षमता आणि उच्च गतीमुळे नवीन उद्योगांची भरभराट होईल ज्यामुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते आकर्षित करतील. तसेच व्हिडिओंच्या मागणीत तीव्र वाढ देखील शक्य आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com