औट्रम घाटात ७-८ ठिकाणी दरडीचा धोका

मोठाले दगडं पडण्याच्या स्थितीत
औट्रम घाटात ७-८ ठिकाणी दरडीचा धोका

औट्रम घाट, कन्नड Autram Ghat, Kannada

औट्रम घाटात Autram Ghat दरड कोसळल्यानंतर मातीचे ढिगारे आणि विशालकाय दगडं बाजूल्या केल्यावर काही प्रमाणात Traffic open करण्यात आली. मात्र, ढगफुटीमुळे अनेक दगडे डोंगराहून सरकण्याच्या स्थितीत असल्याने मोठ्या अपघाताची भीती Fear of accidents नागरीकांना सतावत आहे. शुक्रवारी घटनेच्या ७० तासानंतर चेंदामेंदा झालेला अपघातग्रस्त ट्रक दरीतून वर काढण्यात आला. यातील जनावरे सडल्याने परिसरात प्रचंड दुर्गंध पसरला आहे.

औरंगाबाद-धुळे महामार्ग क्रमांक २११ वर कन्नडच्या औट्रम घाटात मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते ४ दरम्यान ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. यामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली. पैकी एका दरडीमुळे वाहतूक ठप्प झाली. देशदूत प्रतिनिधीने शनिवारी या नैसर्गिक संकटानंतर परिसराची पाहणी केली.

७-८ ठिकाणी दरडीचा धोका

ढगफुटीमुळे डोंगरात अनेक ठिकाणी माती आणि झाडे वाहून गेल्याने विशालकाय दगडे खिळखिळी झाली आहेत. दरड कोसळली त्या ठिकाणी त्याच आकाराचा एक विशालकाय दगड काेसळण्याचा मार्गावर असल्याचे रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्या चाळीसगावच्या संत सत्रामदास इन्फ्रास्टक्चरचे संचालक राज पुंशी यांनी दाखवले. तो वेळेत पाडणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुंशी यांनी ७ जेसीबी आणि २ क्रेन लावून शुक्रवारी सकाळपर्यंत रस्ता साफ केला. घाटात किमान ७-८ ठिकाणी असा धोका असल्याचे प्रतिनिधीने स्थानिक नागरीकांसोबत केलेल्या पाहणीत दिसले. हे धोके दूर केल्याशिवाय घाटात वाहन चालवणे जीवावर बेतू शकते, असे चाळीसगावच्या बोधरे तांंड्याचे बन्सी राठोड म्हणाले.

ट्रकचा झाला चेंदामेंदा

९ म्हशी आणि ३ गायींना घेवून जाणारा आयशर ट्रक कठडे तोडून दरीत कोसळला. शुक्रवारी दुपारी चेंदामेंदा झालेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने वर काढण्यात आला. ट्रकचे केबीन आणि लोडींगच्या भागाचे दोन तुकडे झाले होते. याच्या चालकाचे धड आणि मुंडके वेगळे झाले होते. जनावरे सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. उभे राहणेही शक्य नसतांना राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी बचाव कार्यात लागले होते.

बघ्यांमुळे अडचण

शुक्रवारी सकाळपासून दुचाकीसाठी रस्ता खुला करण्यात आला. मात्र, लोकं वाहने थांबवून खचलेल्या रस्त्याच्या काठावर उभे राहून बचाव कार्य बघण्यासाठी गर्दी करत होते. त्यांना पांगवतांना ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ येत होते. दुपारी पाऊस सुरू झाल्यावर दरडीच्या भीतीने मात्र परिसरात शुकशुकाट पसरला.

किमान दीड महिने काम

घाटात चार ठिकाणी खचलेला रस्ता दुरूस्त करण्यासाठी खालून काँक्रिट करून कठडे बांधावे लागतील. या कामात १५ दिवसांचा कालावधी सांगण्यात आले आहे. मात्र, काम मोठे असल्याने ते किमान दीड महिने चालेल. तोपर्यंत या मार्गावर जड वाहतूक बंद राहेल, असे सूत्रांनी सांगीतले.

नळासारख्या धारा कोसळल्या

घाटा जवळील १२६० लोकसंख्येच्या भांबरवाडीचे शेतकरी नामदेव कोळी म्हणाले, रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि लाईट गेले. दोन तास नळाच्या पाण्यासारखा धारा कोसळत होत्या. पहिल्यांदाच घराच्या ओट्यापर्यंत पाणी आले. आमचा जीव वाचला. पण भविष्यात आमची गावेही खचण्याची भीती असल्याचे लंगडा तांडा, टिकाराम तांडा, सातकंुडड, आंबाडा, आंबा येथील ग्रामस्थ सांगतात.

पंचनामे फक्त पिकांचेच

घाटाखालील शिवापूरचे शेतकरी रोहिदास तूळ राठोड यांच्या ७ एकर शेतात ३ एकरावर कांदे तर ३ एकरवर बाजरी लावली होती. घाटातून एवढ्या वेगात पाणी आले की शेतातील बाजरी आढवी झाली. कांदे वाहून गेले. मोटार कामातून गेली. मंदीराचा पाया वाहून गेला. पाण्यासोबत आलेली वाळू शेतात पसरली. आता वाळू साफ करून मगच शेती करावी लागेल. किमान ४० ते ५० हजाराचे नुकसान झाले. पण पंचनामे फक्त पिकाचेच होतात.

घाटावरील धरणांमुळे नुकसान?

घाटावर तयार करण्यात आलेले वनखात्याचे पाणवठे आणि धरणांमुळे दरड कोसळल्याचा आमचा अंदाज आहे. यातील काही पाणवठे फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अजून ठोस असे काही सांगता येणार नाही.- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव

जाळ्या बसवाव्यात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सहित घाटात डोंगराला लोखंडी जाळ्या बसवल्या जातात. यामुळे दरड थेट रस्त्यावर कोसळत नाही. येथेही अशा जाळ्या बसवायला हव्यात.- राज पुंशी, संचालक, संत सत्रामदास इन्फ्रा.प्रा.लि., चाळीसगाव

ढगफुटीचाच परिणाम

ढगफुटी सदृष्य पावसाशिवाय दरड कोसळण्यासाठी अन्य कोणतेही कारण दिसत नाही. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी डोंगरात लोखंडी जाळी बसवण्याची गरज पडल्यास वन विभागाची परवानगी लागेल. मात्र, सद्या तसे नियोजन नाही.- महेश पाटील, प्रबंधक (तांत्रिक), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com