आता औरंगाबादमध्ये 'मवाल्यां'ची खैर नाही!

आता औरंगाबादमध्ये 'मवाल्यां'ची खैर नाही!

औरंगाबाद - aurangabad

पोलीस निरीक्षक गीता बागडे (Police Inspector Geeta Bagde) यांनी तरुण-तरुणींना विनाकारण रस्त्यावर न थांबण्याचा सूचना केल्या असून औरंगाबाद शहरात कोणत्याही परिस्थितीत टवाळखोरी सहन केली जाणार नसल्याचेही नमूद केले.

(Devagiri College) देवगिरी महाविद्यालयाजवळ एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय कशिशची २१ मे रोजी शरणसिंगने क्रूर हत्या केली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या शरणसिंगच्या कृत्याने शहर हादरून गेले. त्यानंतर महाविद्यालय, (Tuition classes) ट्यूशन क्लासेस, कॅफेतील गैरप्रकार असे मुद्दे प्रकर्षाने समोर आले. त्या पार्श्वभूमीवर कशिशच्या हत्येमागील सामाजिक कारणे जाणून घेत उनाड तरुणाईवर धाक ठेवण्यासाठी उस्मानपुरा पोलिसांनी बुधवारी पाहणी केली. तेव्हा ट्यूशन क्लास, अभ्यासिकाशी संबंध नसलेल्या टवाळखोर, मवाल्यांचे अड्डे झाले आहेत, असे त्यांच्या निदर्शनास आले.

देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा भरदिवसा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर उस्मानपुरा भागातील खाजगी क्लासेस मधील तरुण-तरुणी क्लासेस च्या नावाखाली टवाळखोरी करतात अश्या तरुण तरुणींना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गीता बागडे पोलीस, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्यासह पथकाने तरुण-तरुणींना चौकशी करत विनाकारण न थांबण्याच्या सूचना केल्या. तसेच क्लासेस चालक, हॉटेल व कॅफेचालकांना देखील सूचना केल्या.

दामिनी पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, आशा गायकवाड, एस पी खरात, रुपा साकला, मनिषा बनसोडे सर्व महिला दामिनी पथक यांनी सरस्वती भुवन काॅलेमधे जाऊन, प्राचार्य व शिक्षकांसोबत चर्चा केली. मुलांबरोबरच मुलींना ही विचारपुस चौकशी करण्यात आली, कोणाला काही समस्या असल्यास आपण ०२४०-२२४०५०० या नंबर तसेच डायल ११२ या नंबरवरही आपण संपर्क करू शकता, असे आवाहन सर्व महिला मंडळी, मुली यांना करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com