Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची दररोज हाेतेय तापमान तपासणी

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची दररोज हाेतेय तापमान तपासणी

औरंगाबाद – Aurangabad

काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयात सिंहाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. वाघांची देखभाल करणार्‍या व अन्न-पाणी देण्यासाठी पिंजर्‍यात प्रवेश करणार्‍या केअर टेकरला आधी पाय पोटॅशिअम परमॅग्नेटच्या पाण्यात निर्जंतुक करण्याची सक्ती केली आहे. तसेच प्राण्यांच्या शरीराचे तापमान रोज मोजले जात आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे सल्लागार डॉ. बी.एस. नाइकवाडे यांनी दिली.

- Advertisement -

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून पालिकेचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आलेले आहे. मात्र प्राणिसंग्रहालयातील वाघांसह अन्य प्राण्यांना कोरोनाची लागण येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. गतवर्षी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात एका बिबट्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्राण्यांची काळजी घेतली जात आहे.

आता अलीकडेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातील 8 सिहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. याविषयी माहिती देताना डॉ. नाइकवाडे यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयात सध्यस्थितीत 15 वाघ आहेत. त्यांच्यासह बिबटे व इतर प्राण्यांचीही काळजी घेतली जात आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी दहा प्रमुख उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्राण्यांच्या संपर्कात येणार्‍या केअर टेकरचे दररोज स्क्रिनिंग केले जात आहे. कर्मचार्‍यांना गणवेश, सॅनिटाझर, मास्क नियमितपणे वापरण्याचे बजावले आहे.

प्राण्यांसाठी या प्रमुख उपाययोजना

१) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरच फुटपाथ पी.पी. लोशनने भरून ठेवून त्यावर चुना पावडर ठेवले जात आहे.

२) प्राण्यांना मांसाहार अर्थातच बिफ गरम पाण्यात बुडवून दिले जात आहे. स्वच्छ पाणीही दिले जात आहे.

३) वाघांच्या पिंजर्‍यात केअर टेकर प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुक केले जात आहेत.

४) पशूवैद्यकांकरवी सर्व प्राण्यांची आरोग्य तपासणी रोज केली जात आहे.

५) सोडीयम हायपोक्लोराईड मिश्रित पाण्याची प्राणिसंग्रहालय परिसरात रोज फवारणी केली जात आहे.

६) 24 तास सर्व प्राण्यांची देखरेख व सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या