आता सायबर गुन्ह्यांची होणार जलद उकल

चार जिल्ह्यांना फायदा
आता सायबर गुन्ह्यांची  होणार जलद उकल

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबादेतील न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) सायबर क्राईम विभाग सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड ( Aurangabad, Jalna, Osmanabad and Beed) ही चार जिल्हे या विभागास जोडण्यात आली असून, सायबर गुन्ह्यांची जलदगतीने उकल करणे यामुळे शक्य होणार आहे.

गेल्या काळी वर्षात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून बोगस कॉल करून गंडा घालणे, फेसबुक व व्हॉटसॲप ( Facebook and WhatsApp) सारख्या समाज माध्यमातून महिलांची बदनामी करणे, नोकऱ्यांच्या बोगस संकेतस्थळातून बेरोजगारांची फसवणूक करण्यासारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांचा स्वतंत्र सायबर गुन्हे विभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, कुशल मनुष्यबळ नसल्याने तपासात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक लॅबमध्ये सुरू करण्यात आलेल्या सायबर क्राईम विभागामुळे पोलिसांनाही मदत मिळणार आहे. फॉरेन्सिक लॅबचे उपसंचालक आर.आर. मावळे यांच्या हस्ते नुकतेच सायबर क्राईम विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

०१८ ला मिळाली होती मान्यता

फॉरेन्सिक लॅबमध्ये सायबर क्राईम विभाग सुरू करण्यास गृह विभागाने २०१८ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर १ सप्टेंबर २०२१ रोजी वैज्ञानिक अधिकाऱ्यांची गट ब संवर्गातील पदे उपलब्ध झाली. फॉरेन्सिक लॅब विभागाचे महासंचालक संदीप बिश्नोई, प्रभारी संचालक घुमटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही लॅब सुरू करण्यात आली असून, सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे व मुद्देमाल दाखल करून घेण्यास सुरूवात झाली असल्याचे उपसंचालक मावळे यांनी सांगितले.

संगणक, मोबाईलचा वापर करून केलेल्या सायबर गुन्ह्यांची उकल फॉरेन्सिक लॅबच्या सायबर क्राईम विभागाकडून केली जाईल. व्हिडिओ चित्रण, ध्वनी फितींची तपासणी येथे केली जाईल.

- आर.आर. मावळे, उपसंचालक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com