Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसीताफळाच्या बिया थेट श्वासनलिकेत!

सीताफळाच्या बिया थेट श्वासनलिकेत!

औरंगाबाद – aurangabad

सीताफळाच्या (Custard apple) बिया थेट श्वासनलिकेत किंवा फुफ्फुसांत अडकून जीव टांगणीला लागण्याचा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत होत असून, घाटीत गेल्या आठवड्यांत किमान तीन केसेस या प्रकारच्या झाल्या आहेत. त्यामुळे सीताफळचा आनंद घेताना लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे असून, अशी बी जर काही तासांत काढल्या गेली नाही तर जिवाला धोका होऊ शकतो, असा सावधगिरीचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

- Advertisement -

रसाळ, मधूर आणि ‘क’ जीवनसत्वाने भरपूर असलेल्या सीताफळांचा मोसम सुरू आहे. दौलताबाद-खुलताबादच्या सीताफळांची अवीट गोटी सर्वश्रुत आहे. साहजिकच आबालवृद्ध सीताफळावर ताव मारत नसतील तर नवलच. मात्र, हा अवीट गोडीचा आनंद घेताना मधुनच सीताफळाची बी थेट श्वासनलिकेत; तसेच फुफ्फुसात अडकून जीव टांगणीचा लागण्याचा प्रकार मुलांच्या बाबतीत होत आहे. अशा किमान तीन केस गेल्या दोन आठवड्यांत घाटीत आढळून आल्या आहेत. चिंचोका अडकण्याचे प्रकारही होत असल्याचे घाटीच्या केसेसमधून स्पष्ट झाले आहे. घाटीतच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही या प्रकारच्या केसेस दिसून येत आहेत. अशा प्रकारांमध्ये नेमके काय झाले आहे, हेच पालकांना लवकर कळत नाही. असा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत झाला, तर मुलांना सांगता येत नाही आणि त्यामुळे मोठा पेचप्रसंग उभा राहू शकतो, असेही यानिमित्ताने समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या