Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश

औरंगाबाद – Aurangabad

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभुमीवर पोलिसांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार, शहरात देखील उत्सवातील रुढी परंपरांना बंदीचे आदेश जारी केले आहेत. गणेश मंडळाच्या मंडपात, आसपास गर्दी जमविण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ पाचच व्यक्तींना परवानगी असल्याचे पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता (Commissioner of Police Dr. Nikhil Gupta) यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. नियम मोडल्यास मंडळाच्या पदाधिकारी व इतरांवर कारवाई करण्याचे आदेश गुप्ता यांनी दिले आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवासंदर्भात राज्य शासनाने निर्देश जारी केले आहेत. त्यात धार्मिकस्थळे देखील बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच शहरात यासंदर्भाने स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले. राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच गणेशोत्सव साजरा होणार आहे. सर्वत्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा व जमावबंदी लागू ठेवण्यात आली आहे, त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान देखील मुर्तीचे दर्शन करण्यास परवानगी नसून, आरती व दर्शन ऑनलाईन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सोबतच, सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीचे मुख दर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शनास प्रतिबंध आहे. ऑनलाईन दर्शनाची सोय मंडळांनी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पदाधिकारी किंवा इतर कोणीही मंडळाच्या मंडप किंवा परिसरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक प्रमाणात जमणार नाहीत. आरती करताना पदाधिका-यांनी आवश्यक अंतर राखावे. या सर्व उत्सवादरम्यान कुठलाही भव्य कार्यक्रम अथवा विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या