Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo संचारबंदी असताना ईदनिमित्त खरेदीसाठी झुंबड!

Video संचारबंदी असताना ईदनिमित्त खरेदीसाठी झुंबड!

औरंगाबाद – Aurangabad

15 मेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत संचारबंदी चालू असताना शहरातील सिटी चौक परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. सुजाण नागरिकाने त्याचा व्हीडिओ करून तो व्हायरल केला. हा व्हीडिओ सर्वत्र झळकताच पोलिसांनी त्या दुकानांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. चारच दिवसांवर रमजान ईद आलेली असताना कमाईच्या उद्देशाने दुकानदारांनी दुकाने चालू केल्याचे दिसून येत आहे. 

- Advertisement -

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद व महानगरपालिका औरंगाबाद यांच्या समन्वयाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 19 आस्थापना यांच्याविरुद्ध क्रांती चौक व सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यवाही पथकात कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले, अमोल जाधव,सुविधकार तथा दुकाने निरीक्षक गोविंद गावंडे विठ्ठल बैद्य व महेंद्र अंकुश हे हजर होते. तसेच महानगरपालिका कार्यालयातील वॉर्ड ऑफिसर प्रकाश आठवले, सलमान काझी वरिष्ठ लिपिक, अलीम शेख कनिष्ठ लिपिक, सय्यद अफझल वसुली अधिकारी व इतर पथक यांच्या द्वारा कार्यवाही करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीत पुढील आस्थापना सील करण्यात आले आहेत . 1.ऑनेस्टी, 2.करिष्मा शॉप, 3. साबा कलेक्शन, 4.गुलशन क्लाॅथ, 5.भारत वॉच , 6. झरा क्लाॅथ ,7.आर.के कलेक्शन 8.चांडक किराणा, 9.अभय ट्रेडर्स, 10.रतनलाल मोतीलाल , 11.पंजाब शुटींग शर्तींग ,12.फेमस A1 ट्रेडर्स 13.युनूस टी, 14.रुक्मिणी साडी सेंटर ,15.मनोकामना क्लाथ सेन्टर16.सत्त्या इलेक्ट्रॉनिक , 17 गुडलक फ्लॉवर 18 लुकिंग बॉईज कापड दुकान ,19.लक्की प्लांटस अँड फ्लोरिस्ट.

- Advertisment -

ताज्या बातम्या