महिनाभरात ६१६ जणांवर गुन्हे दाखल   

महिनाभरात ६१६ जणांवर गुन्हे दाखल   

विनाकारण फिरणाऱ्यांना चपराक

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर देशभरात साथ नियंत्रण कायदा १८९७ कायदा लागू करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात १८८ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जात आहे. शहरात गेल्या काही दिवसांत ६१६ जणांच्या विरोधात १८८ प्रमाणे संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरात १२ मार्च पासून अंशत: लॉकडाउन लावण्याची घोषणा करण्यात आली. शिवाय दर शनिवार आणि रविवार आठवड्याचे दोन दिवस पूर्णवेळ लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे.

१२ मार्च २०२१ पासून करोना कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात हॉटेल चालक, दुकानदार, तसेच विविध ठिकाणी काम करणाऱ्यांवर या नियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षित अंतर न ठेवणे, मास्क न लावणे आणि जास्त लोक जमवून रोगाचा प्रसार होण्यास मदत करणे या अंतर्गत विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात १२ मार्च ते १० एप्रिल या दरम्यान १७ पोलिस ठाण्यामध्ये ६१६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत एमआयडीसी वाळुज , सिडको पोलिस आणि क्रांतीचौक पोलिस ठाण्याचा क्रमांक पहिल्या तीनमध्ये आहे. कमी गुन्ह्यांत दौलताबाद, हर्सुल आणि जवाहरनगर पोलिस ठाण्याचा क्रमांक लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com