धक्कादायक ! विवाहितेला सासरच्यांकडून डुकराचे मटन खाण्यास जबरदस्ती
अन्य

धक्कादायक ! विवाहितेला सासरच्यांकडून डुकराचे मटन खाण्यास जबरदस्ती

दिराने विनयभंग केल्याचीही तक्रार

Rajendra Patil Pune

पुणे |प्रतिनिधी|Pune

विवाहित महिलेला डुकराचे मटन खाण्यासाठी जबरदस्ती करत सासरच्या माणसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची आणि दिराने विनयभंग केल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

संबंधित महिलेचा पती, सासू आणि दिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला देहूरोड परिसरात राहण्यास आहे. ११ जून ते शुक्रवार ७ ऑगस्ट या काळात त्यांच्यासोबत सासरचे व्यक्ती मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी शिवीगाळ करुन डुक्कराचे मटण खाण्यासाठी जबरदस्ती करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार संबंधित महिलेने दिली आहे.

माहेरहून चारचाकी गाडी आण असे म्हणून पतीने पट्टयाने मारहाण करून दुखापत केली,असेही तक्रारदार महिलेने सांगितले. दरम्यान, दिराने शिवीगाळ करुन तक्रारदारांकडे यांच्याकडे शारिरिक संबंधाची मागणी करुन त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल,असे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा देहूरोड अधिक तपास करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com