Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगर्भपाताचे साहित्य विकणाऱ्या 'मिशो'वर गुन्हा

गर्भपाताचे साहित्य विकणाऱ्या ‘मिशो’वर गुन्हा

औरंगाबाद – aurangabad

डॉक्टरांच्या (Doctor) चिठ्ठीशिवाय अवैधरित्या ऑनलाईन (Online) पद्धतीने गर्भपाताची औषधे विक्री (Sale of abortion drugs) केल्याप्रकरणी शनिवारी (७ मे) सिटीचौक (police) पोलीस ठाण्यात मिशो ऑनलाईन पोर्टल (Misho Online Portal) आणि एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

उन्हासोबत महागाईचेही ‘चटके’

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखिल मित्तल (रा. औरंगपुरा पोलीस चौकी, ग्‌लमंडी) यांनी मिशो या शॉपिंग पोर्टलवर अवैधरित्या सर्रासपणे गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱया औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकली जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. याप्रकरणी औषध निरीक्षक जीवन दत्तात्रय जाधव यांनी मिशो पोर्टल आणि मिशो पोर्टलवर औषध विक्री करणाऱ्या अजय कुमार सिंग (रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) यांना नोटीस पाठवली होती. मात्र, पत्ता उपलब्ध नसल्याचे कारण पुढे आले. त्यामुळे नोटीस परत आली. यानंतर जाधव यांनी याप्रकरणी सिंग आणि मिशो दोघांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जाधव यांच्या तक्रारीवरून विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक गांगुर्डे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या