औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना!

शंभराच्या नोटा छापणारे जेरबंद 
औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना!

औरंगाबाद - aurangabbad

पैसे कमावण्यासाठी अवैध धंदे करणाऱ्या तरुणांच्या टोळीने शहरात चक्क बनावट नोटा (Counterfeit notes) छापण्याचा कारखाना सुरू केला. दरम्यान, गुन्हे शाखेला (lcb) माहिती मिळाल्याने कारवाई करीत पथकाने ७ जणांच्या टोळीला गजाआड केले. त्यांच्याकडून नोटा छापण्याचे साहित्य आणि १०० रुपयांच्या २५७ बनावट नोटा आणि या नोटा व्यवहारात आणून टोळीने कमावलेले २१ हजार रुपये जप्त केले.

औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना!
अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!

बुधवारी शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीसमोर बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने येथे सापळा लावला. प्लेझर मोपेडवरून (एमएच २० एफवाय ९५७९) आलेल्या एका व्यक्तीला पकडले. चौकशी केल्यानंतर ६ जणांच्या टोळक्याने शहरात बनावट नोटा छापण्याचा कारखानाच सुरू केल्याचे समोर आले. पोलिसांनी कारवाई करीत हनुमंत अर्जुन नवपुते (रा. धारदोनगाव), किरण रमेश कोळगे (रा. गाडीवाट), चरण गोकुळसिंग शिहरे, प्रेम गोकुळ शिहरे (रा. घारदोन), संतोष विश्‍वनाथ शिरसाट (रा. राजीवनगर), हारुन खान पठाण (रा. बायजीपुरा) यांना गजाआड केले आहे. बनावट नोटा चलनात आणणारा अंबादास ससाणे हा अद्याप फरार आहे.

या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने १०० रुपयांच्या २५७ नोटा, बनावट नोटा चलनात आणून टोळीने कमाई केलेले २१ हजार ५०० रुपये, बनावट नोटा छपाईसाठी लागणारी शाई, नोटा कटिंगसाठीचे मशीन, आरोपीची प्लेझर मोपेड जप्त केली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता पोलीस उपायुक्‍त अपर्णा गिते, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्‍त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस जमादार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार विशाल पाटील, रवींद्र खरात, नितीन देशमुख, आनंद वाहूळ व रमेश गायकवाड यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com