कोरोनाच्या काळात जास्तीचे शुल्क आकारल्या प्रकरणी सव्वा कोटीच्या नोटिसा

जिल्हा प्रशासनाने पाठवले कारवाईसाठी प्रस्ताव
कोरोनाच्या काळात जास्तीचे शुल्क आकारल्या प्रकरणी सव्वा कोटीच्या नोटिसा

औरंगाबाद - Aurangabad

कोरानाच्या (Corona) काळात रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बीले आकारणाऱ्या ३० रूग्णालयांना जिल्हा प्रशासनाने (District Administration) नोटीसा बजावल्या. त्यांच्यावर सुमारे १ काेटी २८ लाख रूपयांची अतिरिक्त रक्कम ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला. नोटीसा मिळाल्यावर काही रूग्णालयांनी २९.९५ लाख रूपये रूग्णांना परत केले. तर ९६ लाख अजूनही रूग्णालयांकडे बाकी आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव महानगरपालिकेला (Municipal Corporation) पाठवण्यात आला आहे.

रूग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारणाऱ्या रूग्णांवर कारवाई करावी, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कोराेनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील १४ रूग्णालयांना जास्तीचे बील आकारल्या प्रकरणी ६२.३३ लाख रूपयांच्या नोटीसा बजावल्या. त्यापैकी रूग्णालयांनी २७.०५ लाख रूपये रूग्णांना परत केले. तर ३५.२१ लाख रूपये अजून रूग्णालयांकडे बाकी आहेत.

४ रूग्णालयांवर कारवाईचा प्रस्ताव
नोटीस बजावण्यात आलेल्या १४ पैकी ४ रूग्णालयांनी रक्कम परत न केल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्र्रस्ताव महानगरपालिकेला २७ मे २०२१ रोजी पाठवला आला आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पाठपुरावा करत आहे.

अतिरिक्त रक्कम कोर्टात जमा
नोटीसा बजावण्यात आलेल्या सेठ नंदलाल धूत आणि डॉ.हेडगेवार रूग्णालयांनी या नोटीशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. न्यायालयाने त्यांच्याकडे असणारी जास्तीची रक्कम अनामत रक्कम म्हणून कोर्टात जमा करून घेतली. याबाबत अद्याप अंतीम निर्णय झालेला नाही.

दुसऱ्या टप्प्यात रक्कम वाढली

कोराेनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाने १६ रूग्णालयांना ६४.१० लाख रूपयांचे जास्तीचे बील आकारल्याप्रकरणी नोटीसा बजावल्या. यापैकी पहिली नोटीस दिल्यावर ५ रूग्णालयांनी १.३४ लाख रूपयांची रक्कम रूग्णांना परत केली. तर ४ रूग्णालयांनी अंशत: १.५६ लाख रूपये परत केले. अशा प्रकारे २.९० लाख रूपये रूग्णांना परत करण्यात आले. तर ७ रूग्णालयांने एक रूपयाही परत केलेला नाही. ४ आणि ७ अशा ११ रूग्णालयांनी रूग्णांचे ६१.१९ लाख रूपये परत करण्यासाठी १२ जुलै २०२१ अंतीम नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचे अहवाल आल्यावर अंतीम कारवाईसाठी ते मनपाकडे पाठवले जातील.

४९ ऑडीटर नेमले
बीलामंधील सावळा गोंधळ वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २३ सप्टेंबर २०२० पासून शहरातील ७८ रूग्णालयांसाठी ४९ तर ग्रामीण भागातील २७ रूग्णालयांसाठी १७ ऑडीटरची नेमणूक केली. त्यातून २९ जुलै पर्यंत १०.१६ लाख रूपये जागेवरच कमी करण्यात आले. तर ११ रूग्णालयांनी ४.८३ लाख रूपयांचे बीले जास्तीची बीले आकारण्याचे अहवाल मिळाले आहेत. या रूग्णालयांनही नाेटीस बजावली जाणार आहे.

६६.८६ लाख रूपये वाचले
पहिल्या लाटेत ऑडीटर नेमलेले नव्हते. रूग्ण घरी गेल्यावर बीलाच्या तफावतीतील अडचण दूर केली जायची. तर दुसऱ्या लाटेत रिअल टाईम ऑडीट व्हायचे. म्हणजेच रूग्ण बील अदा करतांना जागेवरच ऑडीटर ते तपासायचे. यामुळे २३ जुलै २०२१ पर्यंत रूग्णांचे ६६.८६ लाख रूपये जागेवरच कमी झाले.

... तरी रूग्णांना एक कोटीचा फायदा
जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचा परिणामही दिसून आला. ऑडीटरने शहरात जागेवर रूग्णांचे ६६.८६ लाख तर ग्रामीणमध्ये १०.१६ लाख रूपयाचे बील कमी केले. तर दोन्ही लाटा मिळून जास्तीचे आकारलेेले २९.९५ लाख रूपये रूग्णांना परत मिळाले. अशा प्रकारे तब्बल १ कोटी १० लाख रूपयांचा रूग्णांना फायदा झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com