औरंगाबाद - Aurangabad

पूर्वी तब्बल १२५ पर्यंत गेलेला कोरोना संसर्गाचा रिकव्हरी रेट पुन्हा एकदा लक्षणीय प्रमाणात घटत चालला आहे. आता हा रेट ८२.५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याने औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यातील १५ तारखेपासून औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिना सुरू होताच ही संख्या झपाट्याने वाढत आहे. १८ मार्च रोजी शहरात ४३५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सर्वाधिक ११६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

रुग्णांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण वाढले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिाकांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून यामुळे मृत्यू दरातही वाढ होण्याची भीती आहे. ज्येष्ठांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मनपाने ‘एमएचएमएच' अॅप सुरू केले, मात्र वाढत्या रूग्णसंख्येमुळे यंत्रणेला सुविधा देणे अवघड झाले आहे. मनपाकडून आलेल्या अहवालानुसार दिवसभरात शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळले. यात ५० वर्षांवरील ३१३ रुग्ण आढळले असून ज्येष्ठांचे हे प्रमाण ३७.२२ टक्के एवढे नोंदले गेले आहे. ही बाब चिंताजनक मानली जात आहे.