Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedव्हॅक्सिन न घेणाऱ्याला दारू दिली तर...

व्हॅक्सिन न घेणाऱ्याला दारू दिली तर…

औरंगाबाद – aurangabad

जिल्ह्यातील (Vaccination) लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याने आता (Collector) जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार ग्रामीण भागात प्रशासनाने कठोर पाऊल उचलत लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणजे आता (Alcohol) दारूच्या दुकानावर लसीकरणाची खात्री न करता ग्राहकांना दारू दिल्यास, दारू विक्रेत्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

कोरोना (corona) प्रतिबंधक लसीकरणाचा अपेक्षित टप्पा न गाठल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रुग्ण जरी घटले असले तरीही लसीकरणाची मोहीम वेगाने हातात घेण्यात आली आहे. त्यामुळे (Government offices, tourist spots, malls) शासकीय कार्यालये, पर्यटन स्थळे, मॉलसह दारूच्या दुकानात येणाऱ्या लोकांना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा लसीकरणाशिवाय परवानगी देणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जाणार आहे.

यापूर्वी लसीकरणाबाबत फक्त शहरात कडक अंमलबजावणी केली जात होती. मात्र आता ग्रामीण भागात सुद्धा दारू विक्रेत्यांना लसीकरण केलेल्या ग्राहकांना दारू विकता येणार आहे.

विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर आता थेट कारवाई करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे तळीराम मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहे. दरम्यान, दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघितल्याशिवाय आलेल्या ग्राहकांना दारू विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती (Tehsildar Rahul Gaikwad) तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या