कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचे उपजिल्हा रुग्णालया समोर उपोषण

कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचे उपजिल्हा रुग्णालया समोर उपोषण

बेड उपलब्ध होण्यासाठी केले उपोषण

मलकापुर - Malkapur

प्राथमिक आरोग्य केंद्र ऊमाळी येथुन दाताळा येथील दाभाडे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र येथील रुग्णालय अधिक्षक डॉ.अमोल नाफडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने खाजगी हॉस्पिटल जाण्याचा सल्ला दिला.

मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने विनवणी केल्यावर ही डॉ.नाफडे यांनी संजय दाभाडे यांना हाकलून दिल्याने लोकशाही मार्गाने उपजिल्हा रुग्णालयाचे गेट समोरच उपजिल्हा रुग्णालय अधीक्षकावर कारवाई च्या मागणीसाठी आमरण उपोषणाला सकाळी अकरा वाजता संजय दाभाडे यांनी सुरुवात केली

ग्राम दाताळा येथील इंदिरा नगर मधील रहिवाशी संजय दाभाडे यांच्या कुटुंबातील त्यांची आई, वडील आणि मुलगी व ते स्वतः कोरोना पॉझिटिव असताना ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने ऊमाळी येथुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवीले असता बेड उपलब्ध नाही, तुम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती व्हा असा सल्ला उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.अमोल नाफडे यांनी त्यांना दिला.

लोशाही मार्गाने लढा

मात्र परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी विनंती केली असता नाफडे यांनी त्यास हाकलून लावले लोकशाही मार्गाने संजय दाभाडे यांनी आपल्या कुटुंबावर उपचार होण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट समोरच आमरण उपोषण सुरु करताच रुग्णालय प्रशासनाची एकच धांदल उडाली.

आई-वडिलांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही तोपर्यंत उपोषण

उपोषणकर्त्याच्या हातापाया पडून आमरण उपोषण मागे घेण्यासाठी विनवण्या करण्यात आल्या मात्र जोपर्यंत आई-वडिलांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याची आक्रमक भुमीका संजय दाभाडे यांनी घेतल्याने तात्काळ ॲम्बुलन्स पाठवून दाताळा येथून त्यांच्या आई-वडिलांना, मुलीला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले व चौघांनाही बेड उपलब्ध करून देत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. यावरुन उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com