औरंगाबादमध्ये कोरोनाचा ‘कहर’

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबादमध्ये दररोज (corona) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून गेल्या 24 तासात 128 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सध्या 304 कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी किती जणांना (Omycron) ओमायक्रॉनची बाधा झाली याचा अहवाल येणे बाकी आहे. मात्र, एकूण 304 मधील 190 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. मेल्ट्रॉन आणि इतर रुग्णालयांत दाखल झालेल्या 114 रुग्णांपैकी एकालाही अद्याप (Oxygen) ऑक्सिजनची गरज पडलेली नाही. नवा विषाणू सौम्य लक्षणांचा आहे. त्याचा कुठलाच गंभीर त्रास होत नाही, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. तरीही काळजी घेणे आवश्यक आहे.

आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (111)

शक्ती नगर 2, सिडको 1, उल्का नगरी 2, कांचनवाडी 1, भूईवाडा 1, एन-नऊ येथे 1, पीसादेवी 1, पडेगाव 4, रेल्वेस्टेशन 1, कमलनयन बजाज दावखाना 1, वेंदात नगर 3, नक्षत्रवाडी 1, बीड बायपास 4, रामनगर 1, एन-वन येथे 1, शेंद्रा 1, अविष्कार कॉलनी 1, एन- दोन येथे 1, एन-चार येथे 3, भवानीनगर 1, आरेफ कॉलनी 1, टी.व्ही सेंटर 1, उस्मानपुरा 3,आरपीएफ 1, आकाशवाणी 1, प्रताप नगर 1, म्हाडा कॉलनी दर्गा रोड 1, बन्सीलाल नगर 1, खडकेश्वर 1,शिवाजीनगर 2, विमानतळ 1, चाणक्यपुरी 1, एमआयटी हॉस्पिटल 1, गणेश नगर 1, शहानुरवाडी 1, जुना बाजार 1, सातारा परिसर 1, विद्युत कॉलनी 1, चिकलठाणा 1, श्रेय नगर 1, अन्य 56

ग्रामीण (17)

औरंगाबाद 12, कन्नड 2, खुलताबाद 1, पैठण 2

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *