Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसावधान... औरंगाबादवर तिसऱ्या लाटेचे सावट !

सावधान… औरंगाबादवर तिसऱ्या लाटेचे सावट !

औरंगाबाद – aurangabad

गेल्या दोन-तीन दिवसातील राज्यातील (corona) कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यातच आता राज्यातील अनेक जिल्ह्यात सुद्धा करोनाचे आकडे वाढतांना पाहायला मिळत आहे. (Marathwada) मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारी सुद्धा अशीच काही चिंता वाढवणारी ठरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २६ नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

ग्रामीण (10)

वैजापूर 9, खुलताबाद 1

मृत्यू (1)

घाटी (1)

1. 65, स्त्री, मयूर पार्क, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 जणांना (मनपा 15, ग्रामीण 03) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 138 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 864 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 653 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 73 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शहरात गर्दीच-गर्दी

औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अनेक भागात होत असलेली गर्दी वाढत्या करोनाच कारण ठरत आहे. या भागात खरेदीसाठी लोकांची रोज मोठ्याप्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एवढ्या गर्दीत सुद्धा नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. त्यामुळे ही गर्दी अशीच राहिली तर कोरोनाचा आकडा आत्तापेक्षा आणखी वाढू शकतो यात काही शंकाच नाही.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (16)

ब्लू बेल सो.1, हर्सूल परिसर 4, श्रीराम नगर 1, रेल्वे स्टेशन परिसर 1, एकनाथ नगर 1, रोकडा हनुमान कॉलनी 1, एसपी कार्यालय परिसर 1, समर्थ नगर 1, ज्योती नगर 1, गादिया विहार 1, अन्य 3

- Advertisment -

ताज्या बातम्या