नगर जिल्ह्यातून औरंगाबादमध्ये येणाऱ्यांची कोरोना तपासणी

रुग्णसंख्या वाढल्याचे चिंता वाढली
नगर जिल्ह्यातून औरंगाबादमध्ये येणाऱ्यांची कोरोना तपासणी

औरंगाबाद - Aurangabad

अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी (Corona test) होणार आहे.

खबरदारी म्हणून कायगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर या ठिकाणी तपासणी केंद्र उभे करण्यात येणार. औरंगाबाद शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण चांगलेच वाढत आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ६१ गावामध्ये (Lockdown) लॉकडाऊन लावण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ही अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांच्या संपर्कातून औरंगाबाद जिल्ह्यात दाखल होऊ नये, यासाठी औरंगाबादचे प्रशासन तेथील परिस्थितीवर नजर ठेवून आहे, व त्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी होणार असून कायगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर या ठिकाणी तपासणी केंद्र उभे करण्यात येणार आहे..

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com