दिलासादायक... औरंगाबादेत कोरोना 'शून्यावर'

ग्रामीणमध्ये केवळ तीन रुग्णांची वाढ
दिलासादायक... औरंगाबादेत कोरोना 'शून्यावर'

औरंगाबाद - aurangabad

(Marathwada) मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शहरातील नागरिकांसाठी 'दिलासादायक' वृत्त असून रविवारी दिवसभरात एकही (corona) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Patient) आढळून आला नाही. तर, तिसऱ्या लाटेत प्रथमच औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर पाहायला मिळाली. त्यामुळे (Administration) प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 13 जणांना (मनपा 09, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 887 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 680 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे (District Administration) जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

ग्रामीण (3)

गंगापूर 1, वैजापूर 2

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com