जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे योगदान महत्त्वाचे

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे योगदान महत्त्वाचे

औरंगाबाद - aurangabad

प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा (sports competition) क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आज जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व औरंगाबाद महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा फुटबॉल कमिटीचे सदस्य, उमर खान, रणजीत भारद्वाज, स्टीफन डिसूझा, क्रीडा स्पर्धा समन्वयक रियाज यांच्यासह, बुन इंग्लीश स्कूल, पोलीस पब्लीक स्कूल, गुरुकुल ऑलम्पीयाड फुटबॉल खेळाडू, पोद्दार आयसीएसई यांच्यासह इतर शाळेचे फुटबॉल पटु उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील खेळाडूच्या स्पर्धा कालावधीत पिण्याच्या पाण्याची सुविधा, फुटबॉल व इतर साहित्यासाठी 50 हजार रुपयांचा मदत निधी देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विजयी खेळाडू गटांना बक्षिस वितरण करण्यात आले. यामध्ये बुन इंग्लीश स्कूल प्रथम तर औरंगाबाद पोलीस पब्लीक स्कूल दुसरा क्रंमाक तसेच 17 वर्षे वयोगटासाठी पोद्दार आयसीएसई, मुलींचा गट प्रथम तर गुरुकूल ऑलम्पीयाड स्कूल यांना द्वितीय क्रमाकांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छतादूत भगतसिंग दरक यांच्यामार्फत विजेत्या गटांना भेटवस्तू देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com